फेसबुकवर राजकारणाचा 'चिखल', राणे आणि शिवसेनेमध्ये सोशल वॉर

फेसबुकवर राजकारणाचा 'चिखल', राणे आणि शिवसेनेमध्ये सोशल वॉर

नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याच मुद्द्यावरून आता आदित्य ठाकरे यांच्या युवासेननं नितेश राणेंना टार्गेट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 8 जुलै : आमदार नितेश राणे यांनी रस्त्याच्या कामाप्रकरणी अभियंत्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याच मुद्द्यावरून आता आदित्य ठाकरे यांच्या युवासेननं नितेश राणेंना टार्गेट केलं आहे.

'चिखल इथेही आहे.. चिखल तिथेही होता...पण तो गजाआड आहे... हा मनाआड,' असं कॅप्शन देत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा स्वच्छता करतानाचा एक फोटो युवासेनेकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या कॅप्शनद्वारे तुरुंगात असलेल्या नितेश राणे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक व्हिडिओ

भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नितेश राणे यांनी ज्या अभियंत्याला मारहाण केली त्याच्या कुटुंबाला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या भेटीवेळीचा हा व्हिडिओ आहे.

'अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केलाचा कलम लावण्याचे आदेश मी दिले आहेत,' असं अभियंत्याच्या कुटुंबाला चंद्रकांत पाटील हे सांगत असल्याचं या ध्वनीचित्रफितीमध्ये ऐकायला मिळत आहे. चंद्रकांत पाटलांच्या या व्हिडिओमुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळणार असल्याचं दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै)रोजी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.

VIDEO : 'माझ्या मुलाला वाचवा', नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण...

First published: July 8, 2019, 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading