मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'साहेब, लग्नांवर बंदी घाला ना, GF चं लग्न जवळ आलं आहे', नेटकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी

'साहेब, लग्नांवर बंदी घाला ना, GF चं लग्न जवळ आलं आहे', नेटकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी

एका पठ्ठ्यानं थेट मुख्यमंत्र्यांना लग्नांवर बंदी घालण्याची मागणी केलीय. आता यामागं त्याचा काही सामाजिक उद्देश वगैरे नाही. तर गर्लफ्रेंडचं लग्न होऊ नये म्हणून त्यानं हा प्रताप केला.

एका पठ्ठ्यानं थेट मुख्यमंत्र्यांना लग्नांवर बंदी घालण्याची मागणी केलीय. आता यामागं त्याचा काही सामाजिक उद्देश वगैरे नाही. तर गर्लफ्रेंडचं लग्न होऊ नये म्हणून त्यानं हा प्रताप केला.

एका पठ्ठ्यानं थेट मुख्यमंत्र्यांना लग्नांवर बंदी घालण्याची मागणी केलीय. आता यामागं त्याचा काही सामाजिक उद्देश वगैरे नाही. तर गर्लफ्रेंडचं लग्न होऊ नये म्हणून त्यानं हा प्रताप केला.

मुंबई, 12 एप्रिल : देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. देशपातळीवर आणि राज्यातील नेतेही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का याची सर्वांना काळजी पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम अगदी लग्नातील पाहुण्यांच्या संख्येवरही निर्बंध आले आहे. पण एका पठ्ठ्यानं थेट मुख्यमंत्र्यांना लग्नांवर बंदी घालण्याची मागणी केलीय. आता यामागे त्याचा काही सामाजिक उद्देश वगैरे नाही. तर गर्लफ्रेंडचं लग्न होऊ नये म्हणून त्यानं हा प्रताप केला.

(वाचा - लाखोंमध्ये एखादीच होते अशी गडबड;2 लाख रुपयांत विकला गेला अनोख्या डिझाईनचा iPhone)

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध आणि शनिवारी तसंच रविवारी वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. या सर्वामुळे सर्वसामान्यांबरोबरच ज्यांच्या घरी लग्न सोहळे होते, त्यांचीही चांगलीच फजिती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत या लॉकडाऊनची घोषणा केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओवर आलेल्या एका मजेशीर कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कमेंटमध्ये चक्क एका प्रियकराने त्याच्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबावं म्हणून राज्यात लग्नांवरच बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

(वाचा - ‘अहो काकी भाजी कितीला देणार?’; विचित्र फोटोशूटमुळं रुबिना दिलैक होतेय ट्रोल)

या तरुणाच्या या पोस्टचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री राज्यातील जनतेला संबोधित करत असतानाच खालील कमेंटमध्ये या तरुणाने कमेंट केली. 'साहेब लग्नावर बंदी घाला ना, माझ्या GF चं लग्न जवळ आले' अशी पोस्ट त्यानं केली होती.

राज्यातील परिस्थिती पाहता कोरोनाचा विषय अत्यंत गंभीर झालेला आहे. पण त्यातही काही तरुण किंवा सोशल मीडिया यूजर्स अशाप्रकारच्या कमेंट करून विषयाच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या गंभीर स्थितीत सर्वच नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जबाबदारी स्वीकारायला हवी. पण या पोस्टनं अनेकांना हसवलं असणार हेही नक्की.

First published:
top videos

    Tags: Cm, Uddhav thackeray