कौतुकास्पद! कंपनी मालकाने जपली सामाजिक बांधिलकी, मार्चमध्येच कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार

कौतुकास्पद! कंपनी मालकाने जपली सामाजिक बांधिलकी, मार्चमध्येच कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार

आपला देश संकटात आहे. आपल्या बांधवांना एकत्र घेऊन लढूया, त्यांचा संसार उघड्यावर येणार नाही याची दक्षता घ्या

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) विळखा वाढत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलं आहे. याअंतर्गत रेल्वेसेवा, बससेवा बंद करण्यात आली आहे. परिणामी नागरिकांना कामावर जाता येणार नाही. घरात बसून त्यांना काम करावं लागणार आहे

गेल्या काही दिवसांपासून ज्यांना शक्य आहे ते वर्क फ्रॉर्म होम करीत असले तरी ज्यांना ते शक्य नाही त्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नये असं आवाहन केलं आहे. सध्या संपूर्ण जग कोरोना या आजाराशी लढा देत आहे. त्यामुळे कंपनी मालकांनी बांधिलकी जपावी व कामगारांचे वेतन कापू नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर एक सुखद बातमी समोर आली आहे.

संबंधित - VIDEO शरद पवारांनी टाळ्या वाजवून मानले आभार, 'जलसा'वरही टाळ्यांचा कडकडाट

अकोल्यातील ओम नम: शिवाय इलेक्ट्रिकल्स व अनुष्का इंडस्ट्रीजचे संचालक प्रदिप उर्फ राजू फाटे यांनी एक सकारात्मक उदाहरण समोर ठेवलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगारही देऊ केला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या कामाचे तास कमी केले असून आरोग्याचा विचार करता आळी-पाळीने काम दिलं जात आहे. त्यांच्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.  राजू यांनी इतर कंपन्यांनाही आपले सामाजिक कर्तत्व पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. आपला देश संकटात आहे. आपल्या बांधवांना एकत्र घेऊन लढूया, त्यांचा संसार उघड्यावर येणार नाही याची दक्षता घेत राजू यांनी स्त्युत्य पाऊल उचललं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2020 07:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading