Home /News /maharashtra /

लेकाच्या शाही विवाहाचा खर्च टाळून 22 जोडप्यांचा फुलवला संसार; लातूरात पार पडला अनोखा सोहळा

लेकाच्या शाही विवाहाचा खर्च टाळून 22 जोडप्यांचा फुलवला संसार; लातूरात पार पडला अनोखा सोहळा

Latur News: लातूरमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या मुलाच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून अन्य 22 जोडप्यांचा विवाह लावून दिला आहे.

    लातूर, 21 ऑक्टोबर: लातूरमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या मुलाच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून अन्य 22 जोडप्यांचा विवाह लावून दिला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी संसार उपयोगी वस्तूंची भेट देखील दिली आहे. लातूरमध्ये सध्या या लग्नसोहळ्याची चर्चा सुरू सर्वत्र सुरू असून अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव केला आहे. सरफराज मणियार असं संबंधित व्यक्तीचं नाव असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. काही दिवसांपूर्वी सरफराज यांच्या मुलाचा विवाह ठरला होता. शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळला आहे. त्यांनी शहरातील 22 गरीब मुस्लीम जोडप्यांचा विवाह लावून दिला आहे. त्यांनी राबवलेला हा उपक्रम सध्या लातूरमध्ये चर्चेचा विषय ठरत असून अनेकांकडून कौतुक केलं जात आहे. हेही वाचा-एकही मृत्यूची नोंद नाही, महापौरांच्या प्रतिक्रियेनं उंचावेल पुणेकरांची मान याबाबत माहिती देताना सरफराज यांनी सांगितलं की, अशाप्रकारे सामूहिक विवाह सोहळा करावा अशी मुलाची इच्छा होती. त्याच्या इच्छेनुसारच हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. खरंतर, श्रीमंत असो किंवा गरीब मुस्लीम धर्मात साध्या पद्धतीनं लग्न करावं, असं सांगितलं जातं. तरीही काहीजण मोठा शाही विवाह करतात. पण आम्ही मुलाच्या लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळून हा सामूहिक विवाहाचं आयोजन केलं होतं. या लग्नासाठी जिल्ह्याबाहेरील अनेक लोक उपस्थित होते, असं मणियार यांनी सांगितलं आहे. हेही वाचा-पुण्यात टोळक्याची दहशत; दिवसाढवळ्या दोन दुकानं फोडली, घटनेचा LIVE VIDEO कोरोना संसर्गामुळे व्यवसाय आणि नोकऱ्यांमध्ये घट झाल्याने अनेकांची आर्थिक गणितं बिघडली आहेत. अशात मुलीचं किंवा मुलाचं लग्न करणं म्हणजे मोठं धाडसाचं काम होतं. पण सरफराज मणियार यांनी समाजातील गरजू लोकांची ही गरज लक्षात घेत, सामाजिक बांधिलकी राखत हा विवाह सोहळा पार पाडला आहे. लातूर जिल्ह्यात सध्या या अनोख्या लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Latur

    पुढील बातम्या