...म्हणून 'त्या' दोघांनी बाईकवर केला घोडागाडीचा पाठलाग, हे आहे सत्य

...म्हणून 'त्या' दोघांनी बाईकवर केला घोडागाडीचा पाठलाग, हे आहे सत्य

मात्र घडलेल्या ह्या प्रकारात चालक गंभीररित्या जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे

पुणे, 07 डिसेंबर : पुण्याच्या रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या घोडागाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वायुवेगानं धावणाऱ्या घोडागाडीमागे बाईकस्वार फरपटत गेले यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पुण्यातल्या येरवडा पुलावर शुक्रवारीही घटना घडली. मात्र, ह्या भरधाव घोडागाडीची बग्गी रिकामीच होती. घोडागाडीच्या पाठोपाठ बाईकवर दोघेजण तिचा पाठलाग करत निघाले.

एकानं घोडा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी गाडी घोड्याच्या नालांच्या ठिणग्या उडाल्या. अखेर घोडागाडी जागच्या जागी थांबली. भरधाव वेगात असणारी गाडी अशी थांबल्यानं घोडे रस्त्यावर पडले आणि त्या घोडागाडीच्या चाकाखाली येत ती व्यक्ती जखमी झाली.

त्याचं झालं असं की, घोडागाडीच्या मागे बाईकवरून पळणारी ही व्यक्ती त्याच घोडागाडीची मालक आहे.घोडे अचानक उधळले आणि रस्त्यावरून सुसाट धावत सुटले. त्यानंतर या चालकानं मागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागितली आणि घोडागाडीचा असा पाठलाग केला.

मात्र घडलेल्या ह्या प्रकारात चालक गंभीररित्या जखमी झाले आहे.  सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनसेचे माजी नगरसेवक बाबू वागस्कर यांनी या घटनेचा उलगडा केला. मात्र, सुदैवानं रस्त्यावर फारसं कुणी नसल्यामुळे होणारा अपघात टळला. तसंच इथून काही अंतरावर पेट्रोल पंप असल्यामुळे मोठा अनर्थ होण्याचा धोका होता तोही टळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 11:28 PM IST

ताज्या बातम्या