Home /News /maharashtra /

बाप रे! या तळीरामांचा VIDEO पाहा मग सांगा... महाराष्ट्रात का वाढतोय कोरोना कहर

बाप रे! या तळीरामांचा VIDEO पाहा मग सांगा... महाराष्ट्रात का वाढतोय कोरोना कहर

Maharashtra corona: सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय रे भाऊ? अल्कोहोल घेऊन कोरोनाला मारायला निघालेले तळीराम पाहा एकदा. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी दुकानदारावर कारवाई केली आहे.

    मालेगाव, 05 एप्रिल : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये विषाणू अधिक जहाल झाल असून तो वेगाने पसरत असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. प्रशासन, डॉक्टर सामाजिक संस्था अगदी सर्व ओरडून ओरडून कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत... पण मालेगावातील दारुच्या खरेदीसाठी उडालेली ही झुंबड पाहा... अशी परिस्थिती असेल तर काय होणार याचा आपण अंदाजही लावू शकणार नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इतर सर्व नियमांबरोबरच सामाजिक स्थानांवर एकमेकांपासून ठरावी अंतरावर किंवा दूर राहणे गरजेचे आहे... एकमेकांच्या संपर्कात आलोच नाही तर कोरोनापासून आपला बचाव होण्याची शक्यता कित्येत पटींनी वाढते. पण मालेगावातहा हा व्हिडिओ पाहा... दारुच्या खरेदीसाठी तळीरामांची एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आता या गर्दीत कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता किती जास्त आहे हे वेगळं सांगायला नको. पण अशा गोष्टी प्रशासनाने किंवा कोणी सांगून कशा समजणार. जोवर समाजातील प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखणार नाही, तोवर हे असे काहीतरी दिसतच राहणार. दुकानदाराला दंड हा प्रकार समोर आल्यानंतर महानगर पालिकेने या दुकानदारावर कारवाई करत त्याला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांकडून कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जात आहे की नाही, याची काळजी दुकानदारानं घेणंही गरजेचं आहे. जर लोक नियम पाळत नसतील त्यांना दुकानदाराने वस्तूची विक्रीच करू नये. एवढी गर्दी असेल तर अशा वेळी दुकानदारांची भूमिका आणखीच महत्त्वाची ठरते. असा विषय असला तरी कोरोना विरोधातील या लढाईत जिंकायचं असेल तर अशा प्रकारांनी तो विजय आणखी लांबत जाणार आहे. त्यामुळं होईल ते केवळ नुकसानच. त्यामुळं सर्वांनीच काळजी घ्यायला हवी.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Malegaon

    पुढील बातम्या