मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...म्हणून पंकजा मुंडेंनी मोदींबद्दल विधान केलं असावं, एकनाथ खडसे उभे राहिले पाठीशी

...म्हणून पंकजा मुंडेंनी मोदींबद्दल विधान केलं असावं, एकनाथ खडसे उभे राहिले पाठीशी

 पंकजा मुंडे पक्षावर नाराज असणं हे स्वाभाविक आहे. पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे.

पंकजा मुंडे पक्षावर नाराज असणं हे स्वाभाविक आहे. पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे.

पंकजा मुंडे पक्षावर नाराज असणं हे स्वाभाविक आहे. पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  sachin Salve

अहमद अली, प्रतिनिधी

भुसावळ, 28 सप्टेंबर : भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी वंशवादावरून केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. 'पंतप्रधान मोदी सुद्धा माझा पराभव करू शकत नाही असं नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी पाहिलं असेल तर ते दुर्दैवी आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आश्चर्य व्यक्त केलं.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरीही मला संपू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेल तर असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट मोदींना आव्हान दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या विधानावर एकनाथ खडसे यांनीही आश्चर्य व्यक्त केलं.

'राज्यसभेत पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नाही मात्र विधानसभेमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना हरविण्यात आलं. ही खंत पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे जनतेच्या विकास कामासाठी जोपर्यंत माझे योगदान राहील तोपर्यंत माझा कुणीही पराभव करू शकत नाही' अशी भावना पंकजा मुंडे यांच्या मनात होती. व त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं' असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.

(Video: मोदींनी ठरवलं तरी मला संपवू शकत नाही, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने खळबळ)

'मात्र मोदीजी सुद्धा माझा पराभव करू शकत नाही असं जर टीकेने म्हटलं असेल तर ते दुर्दैवी असून नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याची भावना पंकजा मुंडे यांची नव्हती असंही एकनाथ खडसे म्हणाले.

पंकजा मुंडे पक्षावर नाराज असणं हे स्वाभाविक आहे. पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने अन्याय होत असून मधल्या काळात पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाचे राज्य आणून देण्यामध्ये ज्यांचे योगदान राहिलं त्यांची जर उपेक्षा पक्षाच्या माध्यमातून होत असेल तर हे योग्य नसून पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, असंही खडसे म्हणाले.

(मोठी बातमी! केंद्राने PFI सह या संघटनांना बेकायदेशीर घोषित करत घातली बंदी)

तसंच, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय हे आयोगाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल. शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला मिळावा ही अपेक्षा आहे. सोळा आमदार अपात्र झाले तर हे सरकार कोसळू शकतं. उद्धव ठाकरे यांनी विश्वास मताला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते, असंही खडसे म्हणाले.

तर शिंदे गट बाहेर पडल्यानंतर नैतिकता म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते असे देखील मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

'शिंदे गटाच्या मंत्रिमंडळातील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत दुर्दैवी वक्तव्य केले आहे. त्यामुळे मराठा समाजासह इतरांच्या भावना दुखावल्या असून आरक्षण मागणं चूक आहे का असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान सावंत यांनी सशर्त माफी मागण्याऐवजी बिनशर्त माफी मागावी व पुढे असं वक्तव्य करणार नाही, असं तानाजी सावंत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

First published: