चिपळूण, 26 जुलै : चिपळूण (chiplun) शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या दौऱ्यात शिवसेनेचे (shivsena) आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला बोलल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पण, ती महिला कोण होती, त्यांच्याशी मी असा का बोललो, याबद्दल खुद्द भास्कर जाधव यांनी खुलासा केला आहे. तसंच, हे जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी घडवून आणलं होतं, असा आरोपही भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी केला.
न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलत असताना भास्कर जाधव यांनी घडलेल्या प्रकरणावर सविस्तर खुलासा केला.
'काल मी जे काही बोललो ते मोडून तोडून दाखवण्यात आलं आहे. पुरात ज्या महिलेचं नुकसान झालं, त्यांच्याशी मी बोललो त्या कोण आहे, तर त्या माजी आमदार खेडेकर यांची पुतणी आहे. स्वाती भोजने असं त्यांचं नाव आहे. त्यांची ओळख मीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करून दिली होती. म्हणून त्या माझ्या भावाच्या मुलीसारख्या आहेत. त्यांचा मुलगा आणि माझ्या मुलगा एका शाळेत शिकतो. ते दोघे चांगला मित्र आहे. तो माझ्या घरी येत असतो.
त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना त्यांची ओळख करून दिली. पुरामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्या एकट्याची बाजू मांडत नव्हते तर सर्वांची बाजू मांडत होते. पण, काही माध्यमांनी माझं विधान मोडून तोडून दाखवलं, जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचे काम करण्यात आले. हे एक षडयंत्र रचलं गेलं होतं. ते कुणी केलं याची माहिती माझ्याकडे आली आहे' असंही जाधव म्हणाले.
सोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम
'परंतु, माझ्या आयुष्यात असे प्रसंग नेहमी घडत असतात. त्यामुळे मी त्याला उत्तर देत नाही. आज माझे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे, उद्या आणखी दीड ते दोन हजार कार्यकर्ते चिपळूण शहरात मदत करण्यासाठी उतरणार आहे, संपूर्ण चिपळूण शहर साफ करून टीका करणाऱ्यांना उत्तर देणार आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.
तर, स्वाती भोजने यांनी ही या प्रकरणावर खुलासा करत भास्कर जाधव यांची कोणतीही चूक नाही असं सांगितलं आहे. ते मला वडिलकीच्या नात्याने बोलले होते. पण, त्यांच्या विधानाचा अपप्रचार करण्यात आला. भास्कर जाधव यांचा आवाज आणि त्यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे, ते नेहमी आम्हाला मदत करत असतात. याबद्दल उगाच वाद निर्माण करण्यात आला, असंही भोजने यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.