• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ...म्हणून शेतकऱ्यांना बक्षिसाचे 50 हजार रुपये देता आले नाही, अजित पवारांनी दिली कबुली

...म्हणून शेतकऱ्यांना बक्षिसाचे 50 हजार रुपये देता आले नाही, अजित पवारांनी दिली कबुली

 'कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यातच केंद्र सरकारकडून 25 ते 30 हजार कोटी थकलेले आहे'

'कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यातच केंद्र सरकारकडून 25 ते 30 हजार कोटी थकलेले आहे'

'कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यातच केंद्र सरकारकडून 25 ते 30 हजार कोटी थकलेले आहे'

  • Share this:
बारामती, 14 नोव्हेंबर : 'कोरोनामुळे (corona) आर्थिक विस्कटल्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं 50 हजारांचे देणं बाकी राहिले आहे. केंद्राकडूनही जीएसटीचे (gst) 25-30 हजार कोटी येणे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना निधी देता आला नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील रघुनंदन पतसंस्थेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बोलत असताना शेतकऱ्यांना 50 हजार का देता आले नाही, याची माहिती दिली. 'उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर 7 मंत्र्यांचं कॅबिनेट मंत्रिमंडळ तयार करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. कर्जमाफीची घोषणा झाली आहे.  नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं देणं देता आलं नाही' असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. एका रात्रीचे 25 हजार; टूरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तरुणींचा भांडाफोड 'कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यातच केंद्र सरकारकडून 25 ते 30 हजार कोटी थकलेले आहे.  आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम देता येईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अशा संकट काळातही केंद्राकडून जीएसटीची रक्कम येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सुतारकाम ते वर्ल्ड कप हिरो थक्क करणारा आहे Matthew Wade चा प्रवास शनिवारी अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात विकास कामाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. त्यावेळी भाषणादरम्यान, काही शेतकऱ्यांनी 50 हजारांचे बक्षीस देणार अशी घोषणा केली होती, त्याबद्दल भरसभेत अजित पवारांना विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर आज अजित पवार यांनी आज खुलासा केला.
Published by:sachin Salve
First published: