Home /News /maharashtra /

...मग फुले,शाहु,आंबेडकरांची तुम्हाला ऍलर्जी आहे का? भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

...मग फुले,शाहु,आंबेडकरांची तुम्हाला ऍलर्जी आहे का? भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहे त्यांना काम करू द्या, असा सल्लावजा टोला भुजबळांनी राज ठाकरेंना लगावला.

राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहे त्यांना काम करू द्या, असा सल्लावजा टोला भुजबळांनी राज ठाकरेंना लगावला.

राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहे त्यांना काम करू द्या, असा सल्लावजा टोला भुजबळांनी राज ठाकरेंना लगावला.

येवला, 02 मे : 'शरद पवार (sharad pawar) छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेत नसल्याचा आरोप राज ठाकरे (raj thackery) करतात, आम्ही तर त्यांचं नाव नेहमीच घेतो मात्र तुम्ही फुले, शाहु,आंबेडकर यांचा नाव का घेत नाही त्यांची तुम्हाला ऍलर्जी आहे का? असा परखड सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal) यांनी राज ठाकरेंना विचारला आहे. येवल्यातील अतिशय महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी बोलत असताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी भोंग्याच्या वादावरून मनसेवर जोरदार टीका केली. 'लोकमान्य टिळकांचा त्याग मोठा आहे. तो विसरता येऊ शकत नाही मात्र त्यांच्या नावाने खोटा इतिहास सांगितलं जात आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.  राज ठाकरे साहेब,  उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहे त्यांना काम करू द्या, असा सल्लावजा टोला भुजबळांनी राज ठाकरेंना लगावला. (होणाऱ्या जावयाने मेव्हणीला नेलं पळवून, मुलीच्या कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय) 'शरद पवार शिवाजी महाराजांचं नाव घेत नसल्याचा आरोप राज ठाकरे करतात, आम्ही तर त्यांचं नाव नेहमीच घेतो मात्र तुम्ही फुले, शाहु,आंबेडकर यांचा नाव का घेत नाही त्यांची तुम्हाला ऍलर्जी आहे का? असा सवाल भुजबळ यांनी केला. (Eid mubarak 2022 Messages : रमजान ईदच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज) 'भिडे गुरुजी यांनी नेहमीच मुस्लिमांच्या विरोधात भूमिका घेतली मात्र, सायकलवरून पडल्यानंतर त्यांचा ऑपरेशन एका मुस्लिम डॉक्टराने केलं ही महाराष्ट्र आणि भारतीय संस्कृती आहे', असंही भुजबळ म्हणाले.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या