...म्हणून नागपुरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू, महापौरांनी दिले स्पष्टीकरण

...म्हणून नागपुरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू, महापौरांनी दिले स्पष्टीकरण

नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा ‘रिकव्हरी रेट’ जास्त दिसत आहे, पण संक्रमण खूप जास्त वाढले आहे.

  • Share this:

नागपूर, 26 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशाची उपराजधानी नागपूरमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे.

'नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा ‘रिकव्हरी रेट’ जास्त दिसत आहे, पण संक्रमण खूप जास्त वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. स्वत:वर बंधने घालून जबाबदारीने या शनिवारी आणि रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे', असं नागपूरचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

'शहरातील कोविड-19 चा धोका वाढत असतानाच संक्रमणाची साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. बेजबाबदारपणे रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या काही लोकांमुळे नियमांचे पालन करणाऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. कोरोनाची साखळी खंडीत व्हावी, नागरिकांनाही शिस्त लागावी यासाठी दोन दिवसांच्या जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे, असं  संदीप जोशी यांनी सांगितले.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 76 टक्यावर

दरम्यान,  कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण शुक्रवारी पुन्हा वाढलं आहे. शुक्रवारपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, 19 हजार 592 रुग्ण बरे झाले. तर 17 हजार 794 नवे रुग्ण आढलले आहेत. तर 416 जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 76 टक्यावर गेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनानं 459 जणांचा बळी घेतला होता. तर 19 हजार 164 नवे रुग्ण आढळून आले होते. तर  17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.

कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचावासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर (Corona vaccine) संशोधन सुरू आहे. पण लस येईपर्यंत सर्वात प्रभावी उपाय म्हणून सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्डचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करण्यात येत आहे.

Published by: sachin Salve
First published: September 26, 2020, 10:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading