Home /News /maharashtra /

Akola News: स्निफर डॉगने लावला आरोपीचा तपास; शोधून काढला घरात लपवलेला गांजा

Akola News: स्निफर डॉगने लावला आरोपीचा तपास; शोधून काढला घरात लपवलेला गांजा

Sniffer Dog Discovered cannabis: अकोल्यात स्निफर डॉगनं आरोपीचा भांडाफोड केला आहे. त्यानं आरोपीच्या घरात लपवलेला गांजा शोधून काढला आहे.

    अकोला, 25 मे: सोमवारी अकोला (Akola) पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं हरिहरपेठ परिसरातील गाडगेनगर येथील रहिवासी असणाऱ्या 39 वर्षीय दीपक भगवान पराते यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी छापा टाकायला जाताना सोबत स्निफर डॉग लुसीलाही सोबत नेलं होतं. यावेळी पोलिसांना आरोपीच्या घरात गांजा सापडला नाही. पण सोबत नेलेल्या स्निफर डॉगनं आरोपीचा भांडाफोड (Sniffer Dog exposed accused) केला असून आरोपीच्या घरातून सुमारे 640 ग्रॅम गांजा शोधून (Discovered cannabis hidden in home) काढला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं दीपक पराते याच्याविरोधात जुन्या शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दैनिक लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी दीपक पराते यांच्या घरात गांजा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. हे ही वाचा -Chandrapur : वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, दहा ट्रॅक्टर जप्त त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पद्मणे आणि त्यांच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे संबंधित आरोपीच्या घरात छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दीपक भगवान पराते याच्या घराची संपूर्ण झडती घेतली. पण पोलिसांना गांजा सापडला नाही. हे ही वाचा -Mumbai : दंड कमी करण्यासाठी 30 हजारांची लाच मागणारा अटकेत, CBI ची कारवाई या कारवाई दरम्यान पोलिसांनी स्निफर डॉगलाही सोबत नेलं होतं. यावेळी स्निफर डॉगनं आरोपी दीपकच्या घरात लपवून ठेवलेल्या गांज्याचा छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 640 ग्रॅम गांजा जप्त केला असून आरोपी दीपक पराते याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  जप्त केलेल्या गांजाची किंमत जवळपास 3 हजार 800 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Akola, Crime news, Raid

    पुढील बातम्या