सोलापूरची स्नेहल अंबरकर बनली पहिली लोकोपायलट, 'राजधानी' चालवण्याचंही स्वप्न

सोलापूरची स्नेहल अंबरकर बनली पहिली लोकोपायलट, 'राजधानी' चालवण्याचंही स्वप्न

स्नेहलचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तिची मोठी बहीण प्रियांका अंबरकर हीसुद्धा जिद्दीने शिक्षण पूर्ण करून पोलीस खात्यात रुजू झाली.माझ्या कुटुंबीयांनी आणि विशेष म्हणजे बहिणीने दिलेली खंबीर साथ यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले, असं स्नेहल सांगते.

  • Share this:

सोलापूर, 24 फेब्रुवारी : ती सध्या काय करते ? या नावाचा एक चित्रपट खूपच गाजला होता. त्यानंर आता महिलांच्या प्रगतीबद्दल बोलताना, ती सध्या कायकाय करते! असं म्हटलं जातं. एसटी बसपासून ते विमानापर्यंत भरारी घेणाऱ्या महिलांची यशोगाथा आणखीनच समृद्ध झाली आहे.

सोलापूरची स्नेहल अंबरकर ही आता लवकरच मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात लोकोपायलट म्हणून रुजू होणार आहे. स्नेहलला लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. इंजिनिअरिंगचं उच्चशिक्षण घेतल्यानंतर तिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. या परीक्षांनतर तिला वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोकऱ्यांची ऑफर आली पण तिने लोकांची सेवा करण्यासाठी रेल्वेचालक म्हणजेच लोकोपायलट होणं पसंत केलं.

असा होता प्रवास

स्नेहलचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. तिच्या वडिलांचं किराणा दुकान आहे आणि आई घरकाम करते. तिची मोठी बहीण प्रियांका अंबरकर हीसुद्धा जिद्दीने शिक्षण पूर्ण करून पोलीस खात्यात रुजू झाली. तिने आपले दोन भाऊ आणि स्नेहलच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.माझ्या कुटुंबीयांनी आणि विशेष म्हणजे बहिणीने दिलेली खंबीर साथ यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले, असं स्नेहल सांगते. आता तिला लोको इन्स्पेक्टरची परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे. त्याचबरोबर राजधानी एक्सप्रेस चालवण्याचंही तिचं स्वप्न आहे.

(हेही वाचा : VIDEO : ट्रम्प आणि मेलेनया यांनी साबरमती आश्रमात केली सूतकताई)

अपयशाने खचली नाही...

स्नेहलने सुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या होत्या. आधी तिला यात अपयश आलं. पण अपयशाने खचून न जाता तिने प्रयत्न सुरूच ठेवले. माझं हे यश माझ्या पूर्ण कुटुंबाचं यश आहे, असं ती आवर्जून सांगते. लोकोपायलट म्हणून काम करण्याच्या तिच्या या प्रवासाला शुभेच्छा.

====================================================================================

First published: February 24, 2020, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading