मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जादूटोण्यासाठी वाघांच्या अवयवांची तस्करी; 11 नखे, 4 हाडे, 4 दातांसह दोघांना अटक

जादूटोण्यासाठी वाघांच्या अवयवांची तस्करी; 11 नखे, 4 हाडे, 4 दातांसह दोघांना अटक

Two arrest for smuggling of Tiger organs: वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना वन विभागाने अटक केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 9 जून: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक वाघांचा मृत्यू (Tiger death) झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच दरम्यान आता चंद्रपूर वन विभागाने (Chandrapur Forest department) दोघांना अटक केली आहे. जे वाघांच्या अवयवाची तस्करी (2 arrested for smuggling tiger organs) करत असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे या वाघांच्या अवयवाची तस्करी जादूटोण्यासाठी होत असल्याचीही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

चंद्रपूर वन विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, काही जण जादूटोण्यासाठी वाघाच्या अवयवांची तस्करी करणार आहेत. ही माहिती मिळताच वन विभागाने सापळा रचला आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर या आरोपींची चौकशी केली असता मरेगाव वनक्षेत्रात ज्या ठिकाणी वाघाचा मृतदेह आढळला होता त्याच ठिकाणी वाघाचे अवयव काढल्याचं सांगितलं.

Web Seriesच्या नावाखाली सुरू होता SEX रॅकेट; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

ज्या ठिकाणी आरोपींनी वाघाचे अवयव काढले होते त्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी तपास केला असता घटनास्थळी मृत वाघाचे 11 नखे, संपूर्ण दात आणि मिश्या वगळून इतर सर्व अवयव आढळून आले.

आरोपी नागेंद्र वाकडे, सोनल धाडसे यांची कसून चौकशी करण्यात आली. आरोपींच्या चौकशीनंतर त्यांच्याकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाची 11 नखे, मिश्यांचे 16 केस, 4 हाडे, लहान दात 4 जप्त करण्यात आले. या प्रकरणी वन विभागाने दोन्ही आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

First published:

Tags: Chandrapur, Crime, Tiger