मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आश्चर्य...कोकणातल्या घनदाट जंगलात दुर्मिळ 'वनमानव', त्याच्याबद्दल वाचून थक्क व्हाल!

आश्चर्य...कोकणातल्या घनदाट जंगलात दुर्मिळ 'वनमानव', त्याच्याबद्दल वाचून थक्क व्हाल!

या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे. तसंच जादूटोणा, करणी , जारण मारण यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याची चर्चा आहे .

या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे. तसंच जादूटोणा, करणी , जारण मारण यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याची चर्चा आहे .

या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे. तसंच जादूटोणा, करणी , जारण मारण यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याची चर्चा आहे .

  दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग 01 जानेवारी : स्लेंडर लोरीस Slender lorises (Loris) हा अत्यंत दुर्मिळ प्राणी  वन्यप्रेमींना आढळून आलाय रात्रीच्या वेळी हा प्राणी हुबेहूब माणसासारखा दिसत असल्यामुळे त्याला वनमानव म्हटलं जातं . मात्र या प्राण्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीची शक्यता असल्यामुळे याचं  अचूक स्थान अत्यंत गुप्त ठेवलं गेलं आहे. स्लेंडर लोरिस अर्थात वनमानव जंगलात आढळणे म्हणजे हे जंगल अद्यापही जैवविविधतेने अत्यंत समृध्द असल्याचं उदाहरण आहे.  स्लेंडर लोरिस हा माकडाच्या प्रजातीतलाच एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. श्रीलंका आणि भारत या दोन देशात याचं मूळ आहे. वन्यजीव अधिनियम 1972 नुसार या प्राण्याचा ' शेड्यूल वन ' म्हणजे अधिसूची क्रमांक एक मध्ये समावेश करण्यात आलाय. दक्षिण भारतात तामिळनाडूत  आणि  अती पावसाच्या पश्चिम घाटातल्या घनदाट जंगलात या प्राण्याचं अस्तित्व आढळलय . सिंधुदुर्गात आंबोली , केसरी , फणसवडे , तळकट , झोळंबे या गावांच्या आसपासच्या जंगलात आणि तिलारीच्या घनदाट जंगलात काही जणांना आत्तापर्यंत हा प्राणी दिसला आहे. अत्यंत हळु हालचाल करणारा हा प्राणी हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला वनमानव म्हटलं गेलय.

  वनमानवाच्या तस्करीचं काय आहे कारण 

  या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे. तसंच जादूटोणा, करणी , जारण मारण यासाठी  तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याची चर्चा आहे . त्यामुळे स्लेंडर लोरिसला  आंतरराष्ट्रीय तस्करीचा धोका आहे . तामिळनाडूत अशाच प्रकारे या प्राण्याची तस्करी आणि शिकार झाल्यामुळे झपाट्याने याची प्रजाती कमी झाली आहे. म्हणून या प्राण्याचं सरंक्षण करण्यासाठी वन्यजीवप्रेमी आणि वनविभागाकडून अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे.

  वडिलांनी PubG डिलीट केल्याने तरुणीने फोडला हंबरडा, 6 लाख लोकांनी पाहिला VIDEO

  तिलारी परिसर अभयारण्य करण्याची गरज 

  सिंधुदुर्गातल्या ज्या तालुक्यात हा स्लेंडर लोरिस आढळलाय तो दोडामार्ग तालुका हा भारत सरकारने नेमलेल्या कस्तुरीरंगन समितिने इकोसेन्सिटीव्ह झोन मधून वगळलाय. त्यामुळे या भागातल्या जंगलतोडीला अद्यापही आळा बसलेला नाही. समृध्द जैवविधता , मुबलक पाणी आणि घनदाट जंगल असल्यामुळेच या भागात अनेक जंगली प्राण्यांप्रमाणेच वाघही आहेत.त्यामुळे हा  परिसर अभयारण्य करावा अशी मागणी होउ लाग्लीय. मात्र तिलारीच्या एकूण जंगलसंपदेपैकी फक्त 28 चौरस किलोमीटरचं जंगल वनविभागाच्या मालकीच आहे आणि उरलेलं म्हणजे जवळपास 95 % जंगल खाजगी मालकीचं आहे . म्हणून अभयारण्य करण्यात अडथळे आहेत.

  First published:
  top videos