मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; चौघांचा मृत्यू तर आणखी काही नागरिक इमारतीत अडकल्याची भीती

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; चौघांचा मृत्यू तर आणखी काही नागरिक इमारतीत अडकल्याची भीती

Ulhasnagar building slab collapsed: उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.

Ulhasnagar building slab collapsed: उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.

Ulhasnagar building slab collapsed: उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.

उल्हासनगर, 15 मे: उल्हासनगर (Ulhasnagar)मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून (Building slab collapsed) दुर्घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 मध्ये असलेल्या मोहिनी पॅलेस इमारतीचा (Mohini Palace Building) स्लॅब दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्बॅल कोसळून तो पहिल्या मजल्यावर आला आणि त्यामुळे येण्या-जाण्याचा रस्ताच बंद झाला. परिणामी इमारतीमधील रहिवासी इमारतीतच अडकले. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे.

मृतकांची नावे 

मॉन्टी पराचे (13 वर्षे)

संध्या डिटवाल (40 वर्षे)

हरेश डोटवाल

मोहिनी पॅलेस ही इमारत जवळपास 25 वर्षे जुनी असून त्यात 9 कुटुंब वास्तव्याला होती. या दुर्घटनेत इमारतीतील 9 जण जखमी झाले आहेत. जखणींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही नागरिकांना इमारतीमधून बाहेर काढले आहे मात्र, अद्यापही काही नागरिक हे इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी एका 14 वर्षांच्या मुलाला आणि एका महिलेला इमारतीतून बाहेर काढलं आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने खिडकीतून एक-एक करुन नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

दुर्घटनेची माहिती मिळताच आसपासच्या परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळा येत होता अखेर पोलिसांनी या बघ्यांच्या गर्दीला पांगवण्यास सुरुवात केली.

First published:

Tags: Ulhasnagar