नवी मुंबईत भरधाव कारने 6 जणांनी चिरडले, 7 वर्षीय चिमुकल्यासह दोघांची मृत्यू

नवी मुंबईत भरधाव कारने 6 जणांनी चिरडले, 7 वर्षीय चिमुकल्यासह दोघांची मृत्यू

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भरधाव कारने सहा जणांनी चिरडले आहे. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जुलै- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भरधाव कारने सहा जणांनी चिरडले आहे. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. नवी मुंबईतील कामोठे भागात रविवारी रात्री साडे सात वाजता ही घटना घडली. एका भरधाव स्कोडा कारने रस्त्यावरून जाणाऱ्या सही जणांनी चिरडले. घटनेनंतर चालक कार घेऊन फरार झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुर्घटना एकढी भीषण होती की, दोन जणांनी जागेवरच आपला प्राण सोडला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

कामोठे सेक्टर 6 येथील सरोवर हॉटेलसमोर ही घटना घडली. स्कोडा कार प्रचंड वेगात होता. त्यामुळे कोणाला काही समजलेच नाही. भरधाव कारने धडक देताच काही जण तर हवे फेकले गेले. कारने आधी एक दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावर दोघे होते. नंतर रस्त्यावरून जाणाऱ्या चौघांनी चिरडले. या घटनेत सात वर्षीय सार्थक चोपडे आणि वैभव गुरव (वय-32) या दोघांचा मृत्यू झाला. मृत मुलाची आई साधना चोपडे (वय-30), श्रद्धा जाधव (वय-31), शिफा (वय-16) आणि आशीष पटेल (वय-22) जखमी झाले आहेत. कार चालकाचे नाव हरविंदर हरभजन सिंग असे असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

VIDEO : राज ठाकरेंकडून काय धडा घेतला? आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्याचा थेट सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading