ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमुळे वाढणार चिंता? 16 जणांना नव्या विषाणूची लागण झाल्याची शक्यता

ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमुळे वाढणार चिंता? 16 जणांना नव्या विषाणूची लागण झाल्याची शक्यता

कोरोनाबाधित प्रवाशांच्या संपर्कात असलेल्या 72 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यापैकी 2 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : ब्रिटनमधून आलेल्या 1122 प्रवाशांपैकी 16 प्रवाशी कोरोनाबाधित आढळले आहेत. या प्रवाशांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहे. या कोरोनाबाधित प्रवाशांच्या संपर्कात असलेल्या 72 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यापैकी 2 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये नागपूर 4 , मुंबई, ठाणे आणि पुणे येथे प्रत्येकी 2, रायगड, नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

दुसरीकडे, राज्यात आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात आजमितीला 58 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. तसंच आज कोरोनाचे नवे 2 हजार 854 रुग्ण आढळून आले आहेत, तर 1526 रुग्ण बरे झाले आहेत. आज 60 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी :

- राज्यात आजपयर्यंत एकूण 18,07,824 कोरोना बाधित रुग्ण बरे

होऊन घरी.

- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.34 टक्के एवढे झाले

आहे.

- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,24,51,919 प्रयोगशाळा नमुण्यांपैकी 19,16,236 (15.39

टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: December 26, 2020, 9:14 PM IST

ताज्या बातम्या