बापरे... 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला सहा वर्षांचा मुलगा

बापरे... 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला सहा वर्षांचा मुलगा

मुलगा बोरवेल मध्ये पडल्याची माहिती मिळताच महसूल यंत्रणा, पोलीस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्ध पातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू केले.

  • Share this:

बब्बू शेख,मनमाड 14 नोव्हेंबर :आई-वडिलां सोबत शेतात गेलेला 6 वर्षाचा मुलगा खेळता-खेळता 200 फूट खोल असलेल्या बोरवेल मध्ये पडला. ही घटना घटना आज सकाळी कळवणच्या बेज येथे घडली. रितेश सोळुंकी असे मुलाचे नाव आहे. त्याचे आई - वडील मुळचे मध्यप्रदेशातील सेंधवा  येथील रहिवासी  शेतमजूरिसाठी  बेज गावात आले होते.आई वडील शेतात काम करत असतांना रितेश  खेळता-खेळता शेतातील सुमारे दोनशे फूट खोल असलेले बोअरवेलमध्ये  पडला. मुलगा बोरवेल मध्ये पडल्याची माहिती मिळताच महसूल यंत्रणा, पोलीस व स्थानिकांनी  घटनास्थळी धाव घेऊन युद्ध पातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू केले. बोरवेलच्या शेजारी  जेसीबीने खोदकाम करून रितेशला सुखरूप  बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला.

मॉर्निंग वॉक करत असलेल्या आजोबांना टेम्पोची भरधाव धडक, CCTV VIDEO

या प्रयत्नात रितेश हा बोअरवेलमध्ये 50 फुटांवरच अडकल्याचं आढळून आलं. काही वेळातच प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आलं आणि रितेश सुखरूप असल्याचं आढळलं. बोअरवेलमध्ये दोरी टाकून रितेशला ती अडकेल अशी काळजी घेण्यात आली. त्याला दोरी बांधण्यात यश मिळतात त्याचा सावकाश वर खेचण्यात आलं आणि रितेश बाहेर निघाला. त्यावेळी त्या बोअरवेल जवळच रुग्नवाहिका तयार ठेवण्यात आली होती.

रितेशला बाहेर काढण्यात यश मिळताच गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. आपला मुलगा सुखरूप असल्याचं पाहून रितेशच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. रितेशला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

VIDEO : MIMच्या नगरसेवकाची दादागिरी, सफाई कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

रितेशवर कळवण  उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. शासकीय अधिकारी,पोलीस आणि ग्रामस्थांची दाखविकेल्या तत्परतेमुळे बालदिनी एका चिमुकल्याला जीवदान मिळाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडून आनंदोत्सव साजरा केला

Published by: Ajay Kautikwar
First published: November 14, 2019, 2:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading