मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अन् पाहता-पाहता सहाही जण पुराच्या पाण्यात वाहून गेली, बार्शीतला हृदयाचा थरकाप उडवणारा VIDEO

अन् पाहता-पाहता सहाही जण पुराच्या पाण्यात वाहून गेली, बार्शीतला हृदयाचा थरकाप उडवणारा VIDEO

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यात पुराच्या पाण्यात तब्बल सहा जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यात पुराच्या पाण्यात तब्बल सहा जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यात पुराच्या पाण्यात तब्बल सहा जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India
  • Published by:  Chetan Patil

प्रितम पंडित, सोलापूर, 28 सप्टेंबर : राज्यातील काही भागांमध्ये पावसाने विसावा घेतला असला तरी काही ठिकाणी पावसाचा प्रकोप बघायला मिळतोय. विशेष म्हणजे आज तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य देखील पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाच्या आकांडतांडवाच्या घटना ताज्या असताना सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यात पुराच्या पाण्यात तब्बल सहा जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे या सहा जणांच्या पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची घटना कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे देखील कैद झाली आहे. पण गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या सहाही जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

संबंधित घटना ही बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी गावात घडली आहे. घोर ओढ्याला आलेल्या पुरातील पाण्यातून हे सहा जण वाट काढत चालत होते. या दरम्यान घोर ओढ्याला आलेल्या पुरातील पाण्याचा वेग जास्त असल्याने सहाही जण एका पाठोपाठ वाहून गेले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी शिकस्त केली. अखेर सहाही जणांचा जीव वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं. पप्पू शिरसागर, पप्पू कुंभार, दिलीप ताकभाते, अनिता ताकभाते पोपट घाडगे, अनुसया घाडगे आणि निखील कुंभार अशी सहाही जणांची नावे आहेत.

(वसईतल्या स्फोटाने तिघांचा जीव घेतला, सात जणांची रुग्णालयात झुंज सुरु)

संबंधित घटना घडली तेव्हा ओढ्याच्या एका बाजूला अनेक गावकरी उभे होते. काहीजण ओढ्याला किती पूर आलाय ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते. यावेळी समोरुन सहाजण सावध गतीने गावाच्या दिशेला चालत येत होते. ओढ्याला पूर आला असला तरी आपण पूलावरुन चालत जावून गावात पोहोचू असं त्यांना वाटत होतं. पण ओढ्याला आलेल्या पुरातील पाण्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे एका व्यक्तीला तोल गेला. त्यापाठोपाठ इतर सर्वच जणांचा तोल गेला आणि ते वाहून गेले. यावेळी गावकऱ्यांनी तातडीने पाण्यात उडी टाकत सर्वांना वाचवलं. अतिशय थरारक ही सगळी घटना होती. वाहून गेलेल्या सर्व सहाही जणांचा नशिब बलवत्तर होतं म्हणून त्यांचा जीव वाचला. त्यांना वाचवण्यात यश आल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे.

First published: