विदर्भात उष्माघाताने घेतला सहा जणांचा बळी

विदर्भात उष्माघाताने घेतला सहा जणांचा बळी

सर्वत्र तापासह गॅस्ट्रो, अतिसार यासह उन्हामुळे होणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत

  • Share this:

10 मे:  राज्याची उपराजधानी नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. नागपूरमध्ये तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा आकडा पार केलाय. वाढत्या उष्णतेमुळे नागपुरात उष्माघातानं 6 जणांचा बळी गेलाय. तर मागील महिनाभरात तब्बल 78 जणांना उष्माघात झाल्याचं आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आलंय. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

सर्वत्र तापासह गॅस्ट्रो, अतिसार यासह उन्हामुळे होणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. नागपूरच्या मेडिकल, मेयो, आयसोलेशनसह सर्व खासगी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांत चारशेहून जास्त गॅस्ट्रो तसेच तत्सम आजारांच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांना उन्हापासून त्रास झाल्यास त्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उष्माघाताच्या संवर्गात होते.

उपराजधानीतील तापमान ४४.५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. या विभागाकडे २६ एप्रिल २०१८ पर्यंत ६२ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद होती, परंतु त्यानंतर सतत कमी-अधिक प्रमाणात तापमान वाढ झाली. त्यामुळे पुढच्या अकरा दिवसांत आजपर्यंत नवीन ७८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या उष्माघाताच्या रुग्णांची संख्या आता थेट १४० वर पोहोचली आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना त्वरित रुग्णांवर योग्य उपचार करून त्याची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात आवश्यक औषधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

First published: May 10, 2018, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading