प्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे

प्रकाश मेहतांसह या 6 मंत्र्यांना मिळाला डच्चू, दिले राजीनामे

प्रकाश मेहतांसह सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. यात प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांनी त्यांचा समावेश आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार आज (रविवारी) राजभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या १३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शपथविधीचा पहिला मान काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आला. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. दुसरीकडे, प्रकाश मेहतांसह सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. यात प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांनी त्यांचा समावेश आहे. या मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्विकारले आहेत.

या नेत्यांची मंत्रिपदी लागली वर्णी..

कॅबिनेट मंत्री

-राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

-जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)

-आशिष शेलार (भाजप)

-संजय कुटे (भाजप)

-सुरेश खाडे (भाजप)

-अनिल बोंडे (भाजप)

-तानाजी सावंत (शिवसेना)

-अशोक उईके (भाजप)

राज्यमंत्री

-योगेश सागर (भाजप)

-अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट)

-संजय (बाळा) भेगडे (भाजप)

-परिणय रमेश फुके (भाजप)

-अतुल सावे – भाजप

असा आहे नवा फॉर्म्युला..

मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला 1021 असा आहे. भाजपला 10, शिवसेनेला 2 तर रिपाइंला एक अशी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे.

राम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका? पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: June 16, 2019, 12:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading