पुणे: कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे: कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. प्रेम विजय पवार (वय- 10,) काजल विजय पवार (वय- 15) अशी मृतांची नावे आहेत.

  • Share this:

रायचंद शिंदे, (प्रतिनिधी)

आंबेगाव (पुणे), 15 जून- आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. प्रेम विजय पवार (वय- 10,) काजल विजय पवार (वय- 15) अशी मृतांची नावे आहेत. दोघे पुणे येथील विश्रांतवाडी येथील रहिवासी होते. सुट्टीनिमित्त ते दोघे चुलत्यांकडे आले होते. कपडे धुण्यासाठी नदीवर गेले असता प्रेम पाय घसरून नदीत पडला असता काजल त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात घसरून बहीण भावाचा मृत्यू झाला.

दोघेही त्यांच्या चुलत्यांसोबत आज सकाळी साडे अकरा वाजेला कपडे धुण्यासाठी नदीवर गेले होते. त्यांच्याबरोबर मोठी बहीण व एक छोटा भाऊ होता. ते घाबरल्याने पाण्यात उतरले नाहीत. गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन्ही मृतदेह मंचर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. मंचर पोलीस अधिक तपास करत आहे.

पुण्यात बुधवार पेठेत वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर फेकले ॲसिड

पुण्यात बुधवार पेठेत वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर एका ग्राहकाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने ॲसिड कमी तीव्रतेचे असल्याने तरुणीच्याला गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे हे प्रकरण?

पीडितेच्या जबाबावरून फरासखाना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणी आणि आरोपी हा पश्चिम बंगाल राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवार पेठेतील एका इमारतीमध्ये राहणारी 22 वर्षीय तरुणी वेश्‍या व्यवसाय करते. आरोपी तरुण हा तिचा नियमित ग्राहक होता. आरोपी शिवाजीनगर परिसरातील एका हॉटेलात भांडी धुण्याचे काम करतो. गुरुवारी (13 जून) दुपारी तो तिच्याकडे आला गेला होता. दरम्यान, तरुणीने आरोपीच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. ॲसिड तिच्या डोळे आणि नाकात गेले. चेहरा भाजल्याने तिने आरडाओरड केली आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. तरुणीला तातडीने जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बाथरूम साफ करण्यासाठी वापरण्याचे हे ॲसिड होते. यामुळे तरुणीला गंभीर दुखापत झाली नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. फरासखाना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

..तर जीभ हासडली असती, उदयनराजेंच्या संतापाचा उद्रेक UNCUT VIDEO

First published: June 15, 2019, 4:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading