मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजपला सर्वात मोठा झटका, नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होणार?

भाजपला सर्वात मोठा झटका, नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होणार?

'फडणवीस आमचे नेते आहेत त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरता कसे ते आम्ही बघतो'

'फडणवीस आमचे नेते आहेत त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरता कसे ते आम्ही बघतो'

भाजपला (BJP) सिंधुदुर्गात खूप मोठा झटका बसला आहे. सेशन कोर्टाने भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर : भाजपला (BJP) सिंधुदुर्गात खूप मोठा झटका बसला आहे. सेशन कोर्टाने भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टात गेल्या दोन दिवसांपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी (hearing on Nitesh Rane bail application) सुरु होती. अखेर कोर्टाने शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. विशेष म्हणजे कोर्टाने याप्रकरणी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवींचा (Manish Dalvi) अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

'आम्ही हायकोर्टात जाऊ किंवा सरेंडरचादेखील पर्याय आहे'

कोर्टाची सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "हायकोर्टात जाण्याचा नक्कीच एक पर्याय आहे. आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ. शक्यतो आम्ही हायकोर्टातच जाऊ. मोबाईल फोन जप्त करायचे आहेत. त्यासाठी कस्टडीची गरज असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं आहे. या व्यतिरिक्त कोणतंही कारण सांगितलेलं नाही. हायकोर्टात याप्रकरणी उद्या अर्ज दाखल करु. मध्ये शनिवार-रविवार सुट्टी असल्याने निश्चितच सोमवारी किंवा मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी होईल. अटकपूर्व जामीनासाठी आम्ही कोर्टात अर्ज केला आहे. त्यामुळे आम्हाला अटकेपासून दूर राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे. हायकोर्टात जायचं नसेल तर आमच्याकडे सरेंडर होण्याचा पर्याय आहे. याशिवाय नितेश राणे यांनी पोलिसांना तपासात पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. यापुढेदेखील आम्ही मदत करु", असं वकील संग्राम देसाई यांनी सांगितलं.

हेही वाचा : कणकवलीत राडा, शिवसेना-राणे समर्थक आमनेसामने

मनीष दळवींचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना मतदान करता आलं नाही

दरम्यान, संतोष परब हल्ल्याप्रकरणी कोर्टाने मनीष दळवी यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहिले. संतोष परब हल्ल्याप्रकरणातील कटात सहभाग असल्याचा उल्लेख समोर आल्यानंतर मनीष दळवी यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी अंतरिम जामीनासाठी सेशन कोर्टात अर्ज केला होता. या दरम्यान बुधवारी (29 डिसेंबर) झालेल्या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांनी नितेश राणेंचे पीए राकेश परब आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवी यांचादेखील संतोष परब मारहाण प्रकरणात समावेश असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आज न्यायमूर्ती हांडे यांनी मनीष दळवींचा जामीन अर्ज फेटाळला.

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला हल्ला झाला होता. या हल्ल्याशी हल्ल्याशी नितेश राणे यांचा संबंध असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. याशिवाय या हल्ल्याच्या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही बघायला मिळाले होते. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु करण्यात आला होता.

हेही वाचा : Sindhudurg District Bank Election: भाजपला मोठा झटका

या दरम्यान नितेश राणे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संतोष परब हल्ल्याप्रकरणात आपलं नाव गोवण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतरपासून नितेश राणे अज्ञातवासात गेले आहेत. विशेष म्हणजे नितेश राणे नेमके कुठे गेले याची माहिती द्यावी यासाठी पोलिसांनी केंद्रीय मंत्री आणि नितेश यांचे वडील नारायण राणे यांनाही नोटीस बजावली होती. या नोटीसीवरुन पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. भाजप नेत्यांनी या नोटीशीला विरोध केला होता.

First published: