• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Sindhudurg Double murder: सावंतवाडीत दुहेरी हत्याकांड; वयोवृद्ध महिलांची निर्घृण हत्या, सिंधुदुर्गात खळबळ

Sindhudurg Double murder: सावंतवाडीत दुहेरी हत्याकांड; वयोवृद्ध महिलांची निर्घृण हत्या, सिंधुदुर्गात खळबळ

वयोवृद्ध महिलांची घरात घुसून हत्या, दुहेरी हत्याकांडाने सिंधुदुर्गात खळबळ

वयोवृद्ध महिलांची घरात घुसून हत्या, दुहेरी हत्याकांडाने सिंधुदुर्गात खळबळ

Double murder in Savantwadi Sindhudurg: सिंधुदुर्गात दोन वयोवृद्ध महिलांची हत्या झाली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  भारत केसरकर, प्रतिनिधी सावंतवाडी, 31 ऑक्टोबर : दिवाळीपूर्वी कोकणात एक भीषण हत्याकांड घडलं आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडी (Sawantwadi) शहरात दोन वयोवृद्ध महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली (double murder in Savantwadi) आहे. सावंत वाडी शहरातील उभा बाजार परिसरात या दोन्ही महिला राहत होत्या. राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग शहरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतक महिलांचे नाव निलिमा नारायण खानोलकर आणि श्यामली शांताराम सावंत असे आहेत. मिलालेल्या माहितीनुसार, निलिमा नारायण खानोलकर यांच्या घरी केअर टेकर म्हणून श्यामली सावंत काम करत होत्या. आज सकाळी साडे आठव वाजता नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर हे त्यांच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. वाचा : नवी मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, आईसह मुलगा-मुलीचा मृत्यू या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. दोन्ही महिलाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही महिलांच्या अंगावरील दागिने गायब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सांगलीतही दुहेरी हत्याकांड सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे शुक्रवारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. बापाला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने आपल्या एका मित्राच्या मदतीने चार जणांना बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी लाथा बुक्क्या, काठी, ऊस अशा मिळेल त्या वस्तूने मारहाण करत चार युवकांना अक्षरश: रक्तबंबाळ केलं आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. दुहेरी हत्याकांडाच्या या थरारक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुख्य संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथीदार विशाल तानाजी चव्हाण फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहापूर येथील रहिवासी असणारे गणेश कोळी, गोरख कावरे आणि विजय माने यांनी गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास किरकोळ कारणावरुन या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. आपल्या वडिलांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुख्य आरोपी मधुकर मोरे याला संताप अनावर झाला.
  Published by:Sunil Desale
  First published: