Home /News /maharashtra /

गोव्यातल्या प्रसिद्ध वकिलाचा भाचीसह बुडून मृत्यू; सिंधुदुर्गात आले असता काळाचा घाला

गोव्यातल्या प्रसिद्ध वकिलाचा भाचीसह बुडून मृत्यू; सिंधुदुर्गात आले असता काळाचा घाला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (Sindhudurg District) एक वाईट बातमी समोर येतेय. नदीपात्रात चार बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलंय.

    सिंधुदुर्ग, 29 मे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (Sindhudurg District) एक वाईट बातमी समोर येतेय. नदीपात्रात बुडून (drowned in a river) मामा आणि भाची (Mama And niece) यांचा मृत्यू झाला आहे. नदीपात्रात चार बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलंय. दोडामार्ग तालुक्यातील कुडासे-वानोशीवाडी येथील तिलारी नदीपात्राच्या दसई भागात चार जण बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आलं. या दुर्घटनेत मामा आणि भाची असा दोघांचा बुडून मृत्यू झाला. विजय पाळवेकर आणि तनिषा ठाकूर अशी मृत मामा- भाचीचं नाव आहे. विजय पाळवेकर हे गोव्याचे वकील आहे. कुडासे गावात त्यांच्या पाहुण्यांकडे आले असताना ही दुर्देवी घटना घडली. अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या, ED च्या हाती महत्त्वाची कागदपत्रे विजय पाळवेकर हे गोव्यातील प्रसिद्ध वकील आहेत. त्यांच्या निधनाने त्यांच्या मित्र परिवारात शोककळा पसरली आहे. उन्हाळी सुट्टीच्या अंतिम टप्प्यातील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कोकणच्या किनारपट्टीवर दाखल होत असतात. त्यामुळे कोकणातील अनेक समुद्रकिनारे पर्यटकांनी चांगलेच बहरलेले असतात. मात्र सिंधुदुर्गात सुट्टीच्या दिवशी घडलेली ही घटना अत्यंत दुर्देवी आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Goa, Sindhudurg news

    पुढील बातम्या