महाराष्ट्राचा महासंग्राम : सिंदखेड राजा मतदारसंघात वंचितमुळे समीकरणं बदलणार

महाराष्ट्राचा महासंग्राम : सिंदखेड राजा मतदारसंघात वंचितमुळे समीकरणं बदलणार

स्वराज्यजननी जीजामातांचं जन्मस्थान असलेला सिंदखेड राजा हा मतदारसंघ प्रसिद्ध आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. शशिकांत खेडकर या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. यंदाही हा जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याचीच दाट शक्यता आहे. पण भाजपचीही हा मतदारसंघ लढवण्याची इच्छा आहे.

  • Share this:

बुलडाणा, 17 सप्टेंबर : स्वराज्यजननी जीजामातांचं जन्मस्थान असलेला सिंदखेड राजा हा मतदारसंघ प्रसिद्ध आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. शशिकांत खेडकर या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. यंदाही हा जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याचीच दाट शक्यता आहे. पण भाजपचीही हा मतदारसंघ लढवण्याची इच्छा आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या डॉ. शशिकांत खेडेकर यांनी भाजपच्या डॉ. गणेश मांटे यांचा तब्बल 20 हजार मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या रेखाताई खेडेकर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. एकेकाळी राजेंद्र शिंगणे यांच्या रूपाने राष्ट्रवादीची या मतदारसंघावर पकड होती. पण आता मात्र इथे राष्ट्रवादीचा काहीच प्रभाव दिसत नाही.

2014 च्या आधी दोन दशकं राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांनी एकहाती सत्ता गाजवली. खरेदी विक्री संघ, बाजार समिती, पंचायत समित्यांवर आपलं वर्चस्व मिळवलं. मात्र जिल्हा बँकेला मदत न मिळाल्यानं 2014 साली डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी माघार घेतली. राष्ट्रवादीकडून रेखाताई खेडेकर मैदानात उतरल्या मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे या जागेवर दावेदारीसाठी काँग्रेस आग्रही आहे.

आघाडीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या जागेसाठी चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदारसंघावर काँग्रेस दावा सांगतंय.

महाराष्ट्राचा महासंग्राम : दर्यापूर मतदारसंघात युतीमध्ये चढाओढ

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं आपली ताकद दाखवून दिली आणि राज्यातलं राजकारण ढवळून निघालं होतं. तोच वंचित फॅक्टर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातही डोकेदुखी ठरण्य़ाची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले मनोज कायंदे यांना वंचितकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू आहे. तसं झालं तर येत्या निवडणुकीत या मतदारसंघातलं मतांचं समीकरण बदलू शकतं. एकूणच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात येणारा काळ राजकीय उलथापालथीचा असू शकतो.

2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

1. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना - 64 हजार 203

2. डॉ. गणेश मंटे, भाजप - 45 हजार 349

3. रेखाताई खेडेकर, राष्ट्रवादी - 37 हजार 161

========================================================================================

SPECIAL REPORT: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून पुन्हा 'राम नामाचा जप'!

Published by: Arti Kulkarni
First published: September 17, 2019, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading