आरक्षणासाठी अब्दुल सत्तार यांचा आमदारकीचा राजीनामा

आरक्षणासाठी अब्दुल सत्तार यांचा आमदारकीचा राजीनामा

धनगर समाजाचे आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सिल्लोड काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

  • Share this:

सिल्लोड, 30 जुलै : मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीये. मराठा आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सिल्लोड काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याआधीही पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्यांची संख्या आता 7 झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, त्यापैकी काँग्रेसचे कही आमदार आज राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते. काँग्रेसच्या आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. याआधीही काँग्रेसचे आमदार पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या आता 7 झाली आहे.

आतापर्यंत 6 आमदारांनी राजीनामा दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. तर इतर पाच आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर आलीय.मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर आणि रमेश कदम भाजपच्या सीमा हिरे आणि राहुल आहेर, तसंच काँग्रेसचे भारत भालके यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. त्यानुसार राजीनामा देण्यासाठी आमदारांनी स्वतः विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणं अपेक्षित असतं. मात्र हर्षवर्धन जाधव सोडून आणखी कोणत्याही आमदारांनी ते धाडस दाखवलेलं नाही. आमदार अब्दुल सत्तार यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

PHOTOS : चिमुरड्याचं डोकं अडकलं हंड्यात...

चाकणमध्ये मराठा आंदोलन हाताबाहेर, 25 पेक्षा जास्त गाड्या जाळल्या

दरम्यान, आज पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली आहे. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या आहे. तर 25 पेक्षा जास्त गाड्या पोलिसांकडून जाळण्यात आल्या आहे. पुण्यातल्या चाकण जवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. हंडेवाडी परिसरात आंदोलकांनी टायर्स जाळून रास्ता रोको केला आहे. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे.

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, 1 ऑगस्टपासून करणार आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे त्यात आता धनगर समाजानेही उडी घेतली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून पृथ्वीराज चव्हाण असो किंवा देवेंद्र फडणवीस असो सरकारने आमची फसवणूक केली आहे असा आरोप करत 1 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या नाहीतर आक्रमक आंदोलन केलं जाईल असा इशारा भाजपमधील धनगर नेत्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात 1 ऑगस्टला सभा तर औरंगाबादमध्ये 1 सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.

नागपुरात आमिष देऊन सरोगसी मदर बनविणारे रॅकेट सक्रिय!

राज्यातील दीड कोटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षापासून घटनादत्त आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. 2014 साली राज्यातील धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून सरकार आणले. परंतू, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा धनगरांना आरक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालविली असल्याचा आरोप उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

मुलाने केला घोटाळा, वडिलांनी केला आरोप

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली!

VIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया !

First published: July 30, 2018, 9:48 PM IST

ताज्या बातम्या