29 नोव्हेंबर : प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य सरकार ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता सिद्धार्थ जाधवची निवड करणारे.राज्यात सरसकट प्लॅस्टिक बंदी करण्याचा विचार राज्य शासन करतंय. शासनाचा हा विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर काम करतील.
पुढच्या वर्षी मार्च महिन्यापासून ही बंदी लागू करण्यात येईल. या कामासाठी सध्या रिंकू आणि सिद्धार्थ या दोघांची नावं विचाराधीन असली तरीही अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. या दोघांशिवाय बॉलिवूडमधला एखादा मोठा चेहराही यासाठी निवडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एकूण 5 ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नेमण्याचा विचार सुरू असून ते शहरी आणि ग्रामण अशा दोन्ही भागात सरकारच्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचा प्रसार आणि प्रचार करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Archi, Rinku rajguru