मंत्र्याची मुलगी असणं हा माझा गुन्हा आहे का?-श्रुती बडोले

मंत्र्याची मुलगी असणं हा माझा गुन्हा आहे का?-श्रुती बडोले

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंची मुलगी श्रुतीनं तिला मिळालेली शिष्यवृत्ती नाकारलीय. तिनं तसं मुख्यमंत्र्यांना पत्रच लिहिलंय.

  • Share this:

07 सप्टेंबर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंची मुलगी श्रुतीनं तिला मिळालेली शिष्यवृत्ती नाकारलीय. तिनं तसं मुख्यमंत्र्यांना पत्रच लिहिलंय. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असल्यानं मी व्यथित झाली असून मी मला मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचा लाभ नम्रतापूर्वक नाकारत आहे, असं तिनं पत्रात म्हटलंय. वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का? असा सवालही तिनं विचारलाय. ब्रिटनमधल्या मँचेस्टर विद्यापीठात पीएचडीसाठी तिची निवड झालीय, त्यासाठी तिला राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती मिळालीय.

पाहूयात श्रुतीनं आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय

माननीय मुख्यमंत्री महोदय,

मी नम्रतापूर्वक आपणास हे पत्र लिहित आहे. मी श्रुती राजकुमार बडोले, IIT मद्रासमधून B. Techचं शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते. यूकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये मी माझं M.Sc. पूर्ण केलं. विद्यापाठीनं गुणवत्तेनुसार मला शिष्यवृत्ती दिली. खगोलभौतिकी आणि अंतराळ संशोधन या विषयात मी मास्टरची डिग्री संपादन केली ती माझ्या गुणवत्तेमुळे.

महोदय, जगातल्या पहिल्या 30 विद्यापीठात माझी Phd साठी निवड झाली. गुणवत्तेनुसार मँचेस्टर या विद्यापीठात प्रवेश घ्यायचं मी ठरवलंय. पीएचडी पूर्ण करण्यासाठी एकूण खर्च 80 ते 90 लाख रुपये असून एवढा भार वडिलांवर देऊ नये असे मला वाटत होतं. महोदय, आपल्याकडे Phd in science यासाठी राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी 3 जागा आहेत. या 3 जागांसाठी केवळ 2 अर्ज आलेत. त्यात एक जागा अजूनही रिक्त आहे. मी कुणाला डावलून शिष्यवृत्ती मिळवली का? जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठांत प्रवेश घेताना आर्थिक निकष लागू होत नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीचा नियम आहे. यात मी पात्र असेल तर यात माझा दोष आहे का? वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का?

महोदय, कुणाचाही हक्क कधी डावलला नाही आणि डावलणार नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असल्यानं मी व्यथित झाली असून मी मला मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचा लाभ नम्रतापूर्वक नाकारत आहे.

आपली विश्वासू,

कु. श्रुती राजकुमार बडोले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 08:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading