महाराष्ट्राचा महासंग्राम : श्रीरामपूरमध्ये विखेंच्या हाती आमदारकीची चावी

महाराष्ट्राचा महासंग्राम : श्रीरामपूरमध्ये विखेंच्या हाती आमदारकीची चावी

लोकसभा निवडणुकीत स्थानिक आमदार भाऊसाहेब कांबळे उमेदवार असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांना २१ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार कोण यावर निवडणूक रंजक होणार आहे.

  • Share this:

श्रीरामपूर, 17 सप्टेंबर : 2009 साली झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर, श्रीरामपूर मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव झाला आणि भाऊसाहेब कांबळे हे सलग दोन वेळा आमदार झाले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली पण सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्याने त्याचा परिणाम इथेही दिसून आला.

विखे समर्थक अशी ओळख असलेल्या आमदार भाऊसाहेब कांबळेंनी बाळासाहेब थोरात यांना साथ दिली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेस ऐवजी शिर्डी लोकसभेत कांबळे यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उघड प्रचार केला.

लोकसभा निवडणुकीनंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघावर विखे पाटलांनी पुन्हा एकदा लक्ष केद्रिंत केल आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ सोडल्याने कांबळे यांना भानुदास मुरकुटे आणि आदिक गटानं साथ दिली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा मुलगा चेतन लोखंडे या मतदारसंघातून इच्छुक आहेत.

लढत विधानसभेची : नाशिक मध्य मतदारसंघात युतीमध्ये चढाओढ

लोकसभा निवडणुकीत स्थानिक आमदार भाऊसाहेब कांबळे उमेदवार असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांना २१ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार कोण यावर निवडणूक रंजक होणार आहे.

यावेळी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा प्रभावही जाणवणार आहे. वंचितने जिल्ह्यातल्या सगळ्या 12 जागा लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) 57 हजार 118

भाऊसाहेब वाकचौरे (भाजप) 45 हजार 634

====================================================================================

विधानसभेआधी पवार काका-पुतण्यात भगवा वाद? पाहा SPECIAL REPORT

Published by: Arti Kulkarni
First published: September 17, 2019, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading