...आणि संतापलेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकाला लावली आग

...आणि संतापलेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकाला लावली आग

श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव येथील शेतकरी रमेश आसने यांनी शेतातून काढलेली सोयाबीनचं पीक पेटवून दिलं.

  • Share this:

हरिष दिमोटे, श्रीरामपूर, 1 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोंगणी केलेल्या सोयाबीनच्या पिकाला आग लावून दिली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यातूनच नैराश्य आलेल्या शेतकऱ्याने आपल्या उभ्या पिकाला आग लावून संताप व्यक्त केला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव येथील शेतकरी रमेश आसने यांनी शेतातून काढलेली सोयाबीनचं पीक पेटवून दिलं. कारण गेली आठ दिवस दररोज पाऊस कोसळत आहे. सोंगणी करून शेतात पडलेली सर्व सोयाबीन पावसाने खराब होवून गेली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यातही सरकारी काम आणी थोड थांब, अशी परीस्थिती असल्याने नुकसानीचे पंचनामे करायलाही अजून कोणी फिरकलं नाही. खराब झालेल्या पिकामुळे सर्वांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. त्यामुळे त्यास आग लावण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

एकीकडे, विधानसभा निवडणूक निकाला लागून आठवडा उलटून गेला तरी राजकीय पक्षांमध्ये सत्तास्पर्धा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. शेतातील काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे सोयाबीन जाग्यावर उगवून आली तर मक्याच्या कणसाला पालवी फुटली आहे. कापसाच्या पूर्णपणे 'वाती' झाल्या आहेत. एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची 'होळी' केली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तात्काळ मदत दिली तर शेतकऱ्यांला आधार मिळू शकतो.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 09:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading