PHOTO : 20 पदव्या मिळवणारा IAS! जो राजीनामा देऊन झाला प्रभावी मंत्री

महाराष्ट्रामधली सर्वात सुविद्य व्यक्ती अशी ओळख असलेले श्रीकांत जिचकार यांच्या पदव्या पाहिल्या तर आपण थक्क होऊन जातो. राजकारणी, चित्रकार, छायाचित्रकार अशी बहुपेडी ओळख असणारे डॉ. जिचकार हे ज्ञानाची आस असणाऱ्या सगळ्यांसाठीच आदर्श आहेत.

  • Share this:

त्यांना देशातली सगळ्यात शिकलेली व्यक्ती म्हटलं जातं. ते IPS आणि IAS परीक्षा उत्तीर्ण झाले पण त्यांनी ही नोकरी झुगारून दिली आणि निवडणूक लढवायचं ठरवलं आणि आमदार झाले. त्यानंतर त्यांनी 14 विभागांचं मंत्रिपद भूषवलं. त्यांच्याकडे 20 पेक्षा जास्त पदव्या होत्या, त्याही फर्स्ट क्लासच्या.

या तरुणाचं नाव आहे डॉ. श्रीकांत जिचकार. करिअरच्या सुरुवातीलाच ते MBBS ची परीक्षा देऊन डॉक्टर झाले. त्यानंतर नागपूरमधूनच ते एम.डी. झाले. ते IPS आणि IAS ही झाले.

श्रीकांत जिचकर यांची निवड IPS साठी झाली होती. नंतर त्यांनी पुन्हा IAS ची परीक्षा दिली. त्यात ते उत्तीर्णही झाले. पण 4 महिन्यांनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 1980 मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली. अवघ्या 26 व्या वर्षी ते देशातले सगळ्यात तरुण आमदार झाले.

आता त्यांच्या आणखी पदव्यांबद्दल बोलूया. श्रीकांत जिचकार यांनी LLM केलं. इंटरनॅशनल लॉ मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मग DBM आणि MBA ही केलं. एवढंच नाही तर श्रीकांत जिचकार यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यांनी बॅचलर ऑफ जर्नलिझमची डिग्री मिळवली. मग संस्कृतमध्ये डिलिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर)केलं.

समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, इंग्रजी साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास, पुरातत्त्व, मानसशास्त्र या विषयांतही एमए केलं. या सगळ्या पदव्या त्यांनी मेरिटमध्ये मिळवल्या. हे शिक्षण घेताना त्यांना अनेक वेळा गोल्ड मेडल मिळाले. 1973 पासून 1990 पर्यंत श्रीकांत जिचकार यांनी विद्यापीठाच्या 42 परीक्षा दिल्या.

श्रीकांत जिचकार इथेच थांबले नाहीत तर ते महाराष्ट्रातले सगळ्यात प्रभावी मंत्री बनले. त्यांनी 14 विभागांचा कार्यभार सांभाळला. 1982 ते 1985 या काळात त्यांनी अनेक मंत्रिपदं भूषवली. 1986 मध्ये ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य झाले. ते 1992 पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते. 1992 ते 1998 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.

1999 मध्ये डॉ. जिचकार राज्यसभेची निवडणूक हरले तेव्हा त्यांनी आपलं लक्ष यात्रांवर केंद्रित केलं. ते देशभर फिरले आणि आरोग्य, शिक्षण आणि धर्माबद्दल भाषणं दिली. त्यांनी यूनेस्कोमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्याकडे देशातलं सगळ्यात मोठं वाचनालय होतं. त्यामध्ये 52 हजारपेक्षा जास्त पुस्तकं होती. श्रीकांत जिचकार यांचं नाव देशातली सर्वात शिकलेली व्यक्ती म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदलं गेलं.

जिचकार हे विद्वान, चित्रकार, छायाचित्रकार आणि अभिनेतेही होते. त्यांनी 1992 मध्ये एका शाळेची स्थापना केली. एवढंच नाही तर त्यांनी संस्कृत विद्यापीठही स्थापन केलं आणि ते त्याचे कुलगुरू झाले. मात्र अतिशय प्रतिभावान असलेले श्रीकांत जिचकार अल्पायुषी ठरले. 2 जून 2004 रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. ते आपल्या कारने मित्राच्या घरून नागपूरला निघाले होते. रस्त्यात त्यांच्या कारला बसने धडक दिली. या अपघातात त्यांचं निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. एवढ्या कमी आयुष्यात त्यांनी अनेक भूमिका निभावल्या आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2019 08:16 AM IST

ताज्या बातम्या