मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai : श्रावण महिन्यात घ्या मुंबईतील शिव मंदिराचे दर्शन; पाहा बोरिवलीच्या ओंकारेश्वरची वैशिष्ट्ये, VIDEO

Mumbai : श्रावण महिन्यात घ्या मुंबईतील शिव मंदिराचे दर्शन; पाहा बोरिवलीच्या ओंकारेश्वरची वैशिष्ट्ये, VIDEO

श्रावण महिन्यात महादेव शंकराच्या मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करत असतात. मुंबईमध्ये ही अनेक महादेव शिवशंकरांची मंदिरे आहेत त्यापैकीच एक बोरिवली (omkareshwar temple in borivali ) भागातील ओंकारेश्वर मंदीर.

मुंबई, 08 ऑगस्ट : श्रावण महिन्यात असलेले शिवपूजनाचे महत्त्व सर्वश्रुत आहे. सोमवार ( shravan somvar ) हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. श्रावण महिन्यात महादेव शंकराच्या मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करत असतात. मुंबईमध्ये ही अनेक महादेव शिवशंकरांची मंदिरे आहेत त्यापैकीच एक बोरिवली (omkareshwar temple in borivali ) भागातील ओंकारेश्वर मंदीर. चला तर मग या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया... ओंकारेश्वर मंदीर हे बोरिवली भागातील पुरातन मंदिरापैकी एक आहे. साधारणतः 1960 साली हे मंदिर स्थापन झाल्याचं पूर्वीचे लोक सांगतात. प्रकाश भाई कापडिया सध्या ट्रस्टचे व्यवस्थापक असून त्यांच्या वडिलांनी हे मंदीर स्थापन केले आहे. "कोणत्याही प्रकारच्या डोनेशन शिवाय हे मंदीर चालवले जाते. त्याकाळी स्वकर्तृत्वावर माझ्या वडिलांनी हे मंदीर स्थापन केले त्यानंतर मी या मंदिराचा विस्तार केला. माझी भगवान शंकरावर पूर्ण श्रद्धा असून आम्ही भगवान शंकराला पूर्वी पासून मानत आलो आहोत. आमच्या पिढ्यान पिढ्या शंकराची भक्ती करतात", असे ट्रस्टचे व्यवस्थापक प्रकाश भाई कापडिया सांगतात. हेही वाचा : Pune : पुण्यातील 200 वर्ष जुने जागृत देवस्थान; श्रावणी सोमवारी होते भाविकांची गर्दी, VIDEO या वेळेस असते भाविकांसाठी मंदीर खुले  ओंकारेश्वर मंदीर सकाळी 5 वाजता खुले होते. सकाळी 5 वाजल्यापासून ते 7 पर्यंत मंदिराची साफ सफाई पूजा-अर्चा होते. सकाळी 7 ला मंदिरात आरती होते. सकाळी 7 वाजल्यापासून मंदीर भाविकांसाठी खुले असते. सकाळी 7 ते 12 पर्यंत दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येतो. दुपारी 12 ते 4 पर्यंत मंदिर हे बंद असते. 4 वाजता परत एकदा मंदीर भाविकांसाठी खुले होते. संध्याकाळी 7 वाजता मंदीरात आरती होते अणि रात्री 11 वाजता मंदीर बंद होते. मंदिराचा संपुर्ण खर्च हा स्वखर्चातून चालविला जातो. श्रावण महिन्यात तर मंदीरात भाविकांची गर्दी पाहण्यास मिळते. श्रावण महिन्यात या मंदिरात विशेष पूजा देखिल केल्या जातात. अनुराधा नायर गेल्या कित्येक वर्षांपासून शंकराची पूजा करण्यासाठी दर सोमवारी मंदिरात येतात. अनुराधा या शंकरभक्त आहेत. अनुराधा म्हणाल्या की,  "मला या मंदिरात येऊन खुप समाधान मिळते. शंकराची सेवा करण्याच सौभाग्य प्राप्त होते. मनाला आत्मिक समाधान मंदिरात आल्यानंतर मिळते".

हेही वाचा :  Akola : कचरा वेचणाऱ्या मुलांच्या स्वप्नांनाही मिळणार बळ! पाहा खास प्रयोग, VIDEO

मंदिरामध्ये होतात विशेष पूजा मंदिराचे पुजारी कमलेश पांचोली म्हणाले की, "मंदिरामध्ये विशेष पूजा देखिल असतात. रूद्र अभिषेक, महारुद्रअभिषेक, लघु रुद्राअभिषेक, अभिषेक या सारख्या पूजा होतात.श्रावण महिन्यात भाविकांच्या सांगण्यानुसार विशेष पूजा देखिल केली जाते. गुगल मॅप वरून साभार कसे पोहोचाल ओंकारेश्वर मंदिरात? ओंकारेश्वर मंदिर, 6VJ7+H4R, वेस्टर्न एक्सप्रेस Hwy, नॅशनल पार्क फ्लायओव्हरच्या खाली, समोरील बाजूस. नॅशनल पार्क गेट, सुकरवाडी, बोरिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 40066 हा मंदिराचा पत्ता आहे. तुम्ही मंदिराला भेट देण्यासाठी पुण्यावरून येत असालतर 171 किलोमीटर अंतर आहे .
First published:

Tags: Mumbai, Temple

पुढील बातम्या