राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसने बजावली कारणे दाखवा नोटीस

राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसने बजावली कारणे दाखवा नोटीस

विखे पाटलांचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वीकारला आहे. आता विखे पाटलांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विखे पाटलांचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वीकारला आहे. आता विखे पाटलांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अशोक चव्हाण यांनी ही नोटिस बजावली आहे. विखे पाटलांना पक्षविरोधी भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विखे पाटील यांच्या विरोधात पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या अनेक तक्रारी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, विखे पाटील यांचे कट्टर समर्थक आणि अहमदनगर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी जिल्हाध्यक्षपद सोडले. त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीही बरखास्त करण्यात आली. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे-पाटील यांचा राजीनामा स्वीकारल्याचे म्हटले आहे.

विखे-पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिले पत्र..

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिल्याचे सांगितले होते. पण तेव्हा त्यांनी आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले नव्हते. विखे-पाटलांनी राजीनामा दिला होता आणि तो राहुल गांधी यांनी स्वीकारल्याचे अशोक चव्हाण यांनी काल जाहीर केले. याचबरोबर चव्हाण यांनी विखे-पाटील यांनी पक्ष सोडून जाऊ नये, असे देखील आवाहन केले होते.

सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्या पाहता राधाकृष्ण विखे-पाटील फार काळ काँग्रेसमध्ये राहणार नाहीत असे दिसते. गेल्या काही दिवसात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय, अशा शब्दात विखे पाटलांनी घणाघाती टीका केली होती. त्याच बरोबर शिर्डी येथे विखे-पाटील समर्थकांच्या सभा होत आहेत. या सभेतून काँग्रेस उमेदवारांचा पराभव करण्याची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे विखे-पाटील फार दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

VIDEO :..जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेस नेत्याच्या घरी पोहोचता!

First published: April 26, 2019, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading