• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • शेतकऱ्याला नवा ताप! ऐन हंगामातच खतांचा तुटवडा, भाताचं होतंय नुकसान

शेतकऱ्याला नवा ताप! ऐन हंगामातच खतांचा तुटवडा, भाताचं होतंय नुकसान

विदर्भात (vidrabha) गेल्या काही दिवसांपासून यूरिया खताचा (Yutiya fertilizer) तुटवडा (shortage) निर्माण झाला असून शेतातील उभ्या भात पिकांचं (paddy crop) त्यामुळं नुकसान होत आहे.

 • Share this:
  नागपूर, 23 ऑगस्ट : विदर्भात (vidrabha) गेल्या काही दिवसांपासून यूरिया खताचा (Yutiya fertilizer) तुटवडा (shortage) निर्माण झाला असून शेतातील उभ्या भात पिकांचं (paddy crop) त्यामुळं नुकसान होत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला लावलेलं भाताचं पिक आता वाढायला सुरुवात झाली असून पिकाच्या निकोप वाढीसाठी खतांची आवश्यकता असते. मात्र नेमक्या याच काळात विदर्भातील अनेक भागांमध्ये खताचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांची तक्रार गडचिरोली जिल्ह्यातील कोरची भागात आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड भागात यूरिया खतांचा मोठा तुटवडा असल्याचं शेतकरी सांगत आहेत. गोंदिया भागातही खतांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक व्यापारी खतांची साठेबाजी करत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. कृषी केंद्रावर जाऊन खतांची मागणी केली असता, खतं संपल्याचं सांगितलं जात आहे. काही व्यापारी जाणीवपूर्वक साठेबाजी करत असून चढ्या किंमतीला खतांची विक्री सुरू असल्याची प्रतिक्रियादेखील काही शेतकरी देत आहेत. खतांचा काळाबाजार यूरिया खताच्या एका गोणीची किंमत बाजारभावानुसार 266 रुपयांना मिळते. मात्र बाजारात सध्या या गोणीचा दर 500 रुपयांवर पोहोचला असल्याचं चित्र आहे. गरीब शेतकऱ्यांना हा दर परवडत नसल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांची वाढ कशी होणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. गरीब शेतकऱ्यांना चढ्या भावाने खते परवडत नसून सामान्य भावाने ती उपलब्धच होत नसल्यामुळे ऐन गरजेच्या वेळी करायचं काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. हे वाचा -निती आयोगाच्या इशाऱ्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण वास्तविक, खतांचा तुटवडा बिलकूल नसून मुबलक प्रमाणात खतं उपलब्ध असल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिल्याची बातमी ‘टीव्ही 9’ने दिली आहे. खतांचा तुटवडा असल्याबाबतची कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आली असून माध्यमांकडे तशी माहिती असेल, तर सरकारला तपशील द्यावेत असं आवाहन कृषीमंत्री भुसे यांनी केलं आहे. जर कुठे खतांचा तुटवडा असेल, तर तो दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने पावलं उचलली जातील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
  Published by:desk news
  First published: