जे दुकान होते कमवण्याचे साधन, त्याच ठिकाणी दुकानदाराने संपवले जीवन

जे दुकान होते कमवण्याचे साधन, त्याच ठिकाणी दुकानदाराने संपवले जीवन

17 मार्चपासून साई मंदिर बंद असल्याने शिर्डीतील संपूर्ण अर्थकारणच ठप्प आहे. अनलॉक होवून देखील मंदिर बंदच असल्याने भक्त नाहीत आणि त्यामुळे अनेक व्यवसाय अडचणीत सापडेल आहेत.

  • Share this:

शिर्डी, 25 जून : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. गेल्या दोन महिन्याच्या कार्यकाळात अनेक दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले. शिर्डीमध्ये एका 55 वर्षीय दुकानदाराने दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

श्रीराम चुटके ( वय 55 ) असं आत्महत्या करणाऱ्या व्यवसायिकाचे आहे.  बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. स्वत: च्या मालकीच्या जनरल स्टोअर्स मधील फॅनला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहित मिळत आहे.

नगर–मनमाड महामार्गावर हॉटेल सिद्धांत जवळ मयत श्रीराम चुटके यांचे जनरल स्टोअर्स आणि कोल्डींक्स्चे दुकान आहे. याच दुकानातील फॅनला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कर्ज आणि त्यातच कोरोनाच्या संकटकाळात व्यवसाय ठप्प असल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

मंदीत संधी! राज्यातल्या महिला गटाने फक्त मास्क विकून कमावले 17 लाख

पोलीस तपासात नेमकं कारण समजू शकेल. मात्र, 17 मार्चपासून साई मंदिर बंद असल्याने शिर्डीतील संपूर्ण अर्थकारणच ठप्प आहे. लॉकडाउनचा दीर्घ कालावधी त्यानंतर अनलॉक होवून देखील मंदिर बंदच असल्याने भक्त नाहीत आणि त्यामुळे अनेक व्यवसाय अडचणीत सापडेल आहेत.

अनेकांचा रोजगार बुडाला आहे. कर्ज, हप्ते, घरखर्च अशा एक ना अनेक समस्या सतावत आहेत. अशाच नैराश्याचा हा बळी तर नाही ना असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 25, 2020, 9:54 AM IST

ताज्या बातम्या