Home /News /maharashtra /

आधी दुकानं फोडली नंतर आइस्क्रीम खावून झाले पसार, बारामतीच्या चोरांचा VIDEO व्हायरल

आधी दुकानं फोडली नंतर आइस्क्रीम खावून झाले पसार, बारामतीच्या चोरांचा VIDEO व्हायरल

कलर पेंट, चप्पल शूज, डिझाईनिंग आणि आइस्क्रीम पार्लर असे पाच दुकाने क्रमाने फोडून या दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे.

बारामती, 27 डिसेंबर : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. बारामतीममध्ये (Baramati) चोरट्यांनी एकाच रात्री एकापाठोपाठ दुकानं फोडल्याची घटना समोर आली आहे. दुकानातील रोख रक्कम लंपास करून चोरांनी आइस्क्रीम फस्त केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बारामतीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकातील सुख शांती अपार्टमेंटयेथील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरने फोडून यातील रोख रक्कम लंपास केली आहे. शहरातील शिवाजी चौकातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या या अपार्टमेंटमधील शिवशक्ती इंटरप्राईजेस, इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातील रोख चोरट्यांनी चोरून नेली आहे. तसंच कलर पेंट, चप्पल शूज, डिझाईनिंग आणि आइस्क्रीम पार्लर असे पाच दुकाने क्रमाने फोडून या दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे. विशेष म्हणजे, रक्कम चोरल्यानंतर या चोरट्यांनी आइस्क्रीमचे दुकान फोडून आईस्क्रीम खाऊन नंतर हे चोरटे पसार झाले आहेत. नवीन वर्षात 'या' गोष्टी बदणार; सामन्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम सकाळी हे दुकाने फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर दुकान मालकांनी घटनेची माहिती बारामती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून पाहणी केली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Thief, चोरी

पुढील बातम्या