• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • वेश्यागमन करून बाहेर आला अन् हवेत केला गोळीबार, लोकांनी दगडफेक करताच पळाला!

वेश्यागमन करून बाहेर आला अन् हवेत केला गोळीबार, लोकांनी दगडफेक करताच पळाला!

दोघा व्यक्तींपैकी एकाने गल्लीत उभं राहत आपल्या जवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:
भिवंडी, 28 जून : भिवंडी (bhiwandi) शहरातील देह व्यापार करणाऱ्या हनुमान टेकडी (bhiwandi hanuman tekdi red light area) या भागात वेश्या गमनासाठी आलेल्या दोघा व्यक्तींपैकी एकाने परिसरात हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान टेकडी परिसरात वेश्या गमन करण्यासाठी दोन तरुण आले होते.  एका कारमधून आलेल्या दोघा व्यक्तींनी एक महिलेसोबत वेश्यागमन केलं. त्यानंतर खोली बाहेर पडल्यावर कोणत्या तरी कारणावरून त्या दोघा व्यक्तींपैकी एकाने गल्लीत उभं राहत आपल्या जवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. सदरची व्यक्ती रस्त्यावर येऊन आपल्या कारजवळ आली असता स्थानिक नागरिकांनी त्याच्या दिशेने दगडफेक केली.

नाक साफ करण्यासाठी कपलनं नाकात घातला लसूण; 20 मिनिटांनी जे घडलं ते किळसवाणं

त्यावेळी त्याने त्या ठिकाणी सुद्धा हवेत गोळीबार केल्याने तेथील दगडफेक करणारे पांगले. याचा फायदा घेत गोळीबार करणारा तरुण त्या ठिकाणाहून कारसह पसार झाला. दरम्यान, स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत कारच्या काचा फुटल्या असून या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना फरार आरोपींच्या कारचा नंबर मिळवला असून त्या दिशेने पोलिसांची पथके गोळीबार करून पसार झालेल्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. दुसऱ्या मुलासोबत बोलली म्हणून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला विहिरीत ढकलले तर, महिलेच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया शहर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली असून या घटने नंतर परिसरातील महिलां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Published by:sachin Salve
First published: