Home /News /maharashtra /

दरड कोसळल्याने घाट बंद; उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट, मात्र वाटेतच सोडले महिलेने प्राण, नंदुरबारमधील घटना

दरड कोसळल्याने घाट बंद; उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट, मात्र वाटेतच सोडले महिलेने प्राण, नंदुरबारमधील घटना

Nandurbar woman died because of no treatment: दरड कोसळून रस्ता बंद, उपचाराला नेताना वाटेतच महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 8 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात दरड कोसळून मार्ग बंद (Road closed due to landslide) झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेचा तडफडून (woman dies due to no treatement) अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबारमधील चांदसैली (Chandsaili Nandurbar) येथील ही घटना आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नंदुरबारमधील चांदसौली येथे मुसळधार पावसात दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे या परिसरातील घाट रस्ता बंद झाला आणि परिणामी नागरिकांना शहराकडे जाण्यासाठी पायी मार्गच शिल्लक राहीला. सिदलीबाई पाडवी ही महिला आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते मात्र, रस्ताच बंद असल्याने शेवटी त्यांच्या पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली. आपल्या पत्नीला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी पतीची पायपीट सुरू होती पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. कारण, सिदलीबाई यांनी वाटेतच प्राण सोडले. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. जळगावात नदीला पूल नाही; उपचारापूर्वीच बालिकेचा बोटीत तडफडून अंत जळगाव जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात बोरी नदीला पूर आलेला आणि त्यात येण्याजाण्यास नदीवर पूल नाहीये. 13 वर्षांची मुलगी तापाने फणफणत होती मात्र, नदीवर पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून उपचारासाठी नेता आले नाही. तसेच गावात डॉक्टर नाही अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारसाठी नेण्यासाठी नदी काठावर आणले. काही तरी प्रयत्न करू...पण दुर्दैव...! तिथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला. आदिवासी आरुषीचा करूण अंत झाल्याने गाव हळहळला. अमळनेर तालुक्यातील सात्री येथे आरुषी सुरेश भिल ही 13 वर्षांची मुलगी तापाने आजारी होती. मात्र बोरी नदीला पूर आलेला आणि वर्षानुवर्षे हे गाव पूल नसल्याने जीव धोक्यात घालून नदी ओलांडत असत. मात्र पूर जास्त असल्याने मुलीला दवाखाण्यात नेता आले नाही तर डॉक्टरला गावात येता येत नाही. सकाळी मुलीचा ताप वाढला अस्वस्थ झाल्याने कसे तरी तिला खाटेवर टाकून नदी ओलांडू म्हणून नदी काठावर आले. मात्र आरुषीचे दुर्दैव आड आले. तिचा झटका येऊन तेथेच मृत्यू झाला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Rain

    पुढील बातम्या