मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! चालत्या गाडीत 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पुण्यात उतरल्यानंतर दाखल झाला गुन्हा

धक्कादायक! चालत्या गाडीत 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पुण्यात उतरल्यानंतर दाखल झाला गुन्हा

पोलिसांनी गाडी जप्त केली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी गाडी जप्त केली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी गाडी जप्त केली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

वाशिम, 11 जानेवारी : खासगी ट्रॅव्हल्सच्या चालत्या गाडीत 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना वाशिमच्या मालेगाव परिसरात घडली आहे. 6 डिसेंबर रोजी घडलेली ही घटना तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी गाडी जप्त केली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

गोंदियावरून 24 वर्षीय तरुणी खासगी ट्रॅव्हल्सने पुण्याला निघाली होती. मात्र वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यात पोहोचल्यावर सदर तरुणीने पुणे ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली असता हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

गुडविल्स ट्रॅव्हल्सच्या गाडी क्र UP 73 A 8020 गाडीने पुण्याला जाणाऱ्या या गोंदिया येथील 24 वर्षीय तरुणीला गाडीतील सीट तुमची नसल्याचं कारण सांगून क्लीनर समीर देवकरने मागच्या सीटवर बसवलं आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. जर आरडाओरड केली तर चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकीही तरुणीला देण्यात आली.

त्यामुळे सदर तरुणीने रांजणगांव इथं उतरल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता गुन्हा दाखल करण्यात आला. ही अत्याचाराची घटना वाशिम जिल्ह्यात घडल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी वाशिम जिल्ह्यातील मालेगांव पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केल्यानं पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स ट्रॅव्हल्सची गाडी जप्त केली असून आरोपी समीर देवकरच्या अटकेसाठी पथक पाठविण्यात आलं आहे.

दरम्यान, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करतानाही तरुणी सुरक्षित नसतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचं काय, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Washim, WASHIM NEWS