VIDEO : पप्पा नको ना, तरीही निर्दयी बाप मुलीला देत होता मेणबत्तीचे चटके

VIDEO : पप्पा नको ना, तरीही निर्दयी बाप मुलीला देत होता मेणबत्तीचे चटके

या निदर्यी बापाने आपल्या तीन मुलांना कसा मारतो ते बघा, तर कधी चिमुकल्याला चक्क मेणबत्तीने चटके सुद्धा देतो.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : मुले थोडंही आपल्या दृष्टीआड झाली तर बापाचा जीव कसा सैरभैर होतो. मुलांना चांगले जिवन जगता यावे म्हणून बाप वाटेल ते करतो, त्यांना वळण लागावे म्हणून प्रसंगी रागवतोही पण त्या रागवण्यात सुद्धा प्रेम हे कायम असते . मात्र सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेला या निर्दयी बापाचं कृत्य पाहून आपल्या सुद्धा तळ पायातली मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या निदर्यी बापाने आपल्या तीन मुलांना कसा मारतो ते बघा, तर कधी चिमुकल्याला चक्क मेणबत्तीने चटके सुद्धा देतो.

या निदर्यी बापाचा प्रकार पाहून अनके सामाजिक कार्यकर्ते देखील हादरून गेले, गेले असून ते सुद्धा याला शोधायच्या प्रयत्नात आहे, हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तो महाराष्ट्रातलाच आहे हे निश्चित आहे.

या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या आरोपीला पकडून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करत केली जात आहे. हा कोणीतरी सरकारी कर्मचारी असावा असे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे कारण ज्या घरात हा प्रकार होत आहे हे एक सरकारी क्वार्टर असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओच्या आधारे या निर्दयी बापाला अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

हेही वाचा

PHOTOS : चंद्रग्रहण का आहे महत्त्वाचे?, जाणून घ्या ही 5 कारणं 

गुरूपौर्णिमा विशेष : राजकीय नेत्यांचे 'राजकारणात'ले गुरू

VIDEO :...आणि नारायण राणेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

First Published: Jul 27, 2018 07:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading