सोलापुरमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जातानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!

सोलापुरमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जातानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!

धक्कादायक बाब म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांसमोर हा सारा प्रकार घडत असूनही पोलीस बघ्याची भूमिका घेताना पाहायला मिळतायत.

  • Share this:

22 फेब्रुवारी : सोलापूर जिल्ह्यातल्या तांबेवाडी शाळेच्या परिसरातून इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच शाळेत कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जाते, याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांसमोर हा सारा प्रकार घडत असूनही पोलीस बघ्याची भूमिका घेताना पाहायला मिळतायत.

शाळेच्या मागच्या बाजूला बसुन एक तरुण वर्गातील विद्यार्थ्याला खिडकीतून कॉपी पुरवत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. धक्कादायक बाब म्हणजे कॉपी होतानाचे स्पष्ट दिसत असूनही शिक्षण अधिकारी सत्यवान सोनवणे तसेच केंद्र प्रमुख कांबळे यांनी असा प्रकार घडला नसल्याचं ठामपणे सांगितलं. तसा अहवालही या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

एकीकडे पेपर फुटण्याचे प्रकार आणि दुसरीकडे मुलांच्या कॉपी करण्याचं प्रकार समोर आल्यामुळे शिक्षण व्यवस्था आणि मुलांचं भविष्य धोक्यात असल्याचेच हे संकेत आहेत. आता या सर्व प्रकाराला शिक्षण विभाग तसंच पोलीस प्रशासनाचाच आशीर्वाद आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. असे गुन्हेगारी आणि गैरवर्तन करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोण खतपाणी घालतं आहे हे या व्हिडिओ मधून समोर येतेय

First published: February 22, 2018, 1:07 PM IST

ताज्या बातम्या