Home /News /maharashtra /

कासवांची जिथे होते देखभाल, तिथेच गेला लहान पिल्लांचा जीव, पाहा हा धक्कादायक VIDEO

कासवांची जिथे होते देखभाल, तिथेच गेला लहान पिल्लांचा जीव, पाहा हा धक्कादायक VIDEO

वनविभागाने कोकणातील वनांबरोबर आता नवजात कासव पिल्लांची निर्दयपणे कत्तल सुरू केली आहे.

    शिवाजी गोरे,प्रतिनिधी दापोली, 11 मार्च :   कासव संवर्धन केंद्राच्या  हलगर्जीपणा मुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओ  कासव संवर्धन केंद्राच आहे. कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले आहेत, हे वास्तव व्हायरल व्हिडीओमुळे उघड झाले आहे. त्यामुळे चांगलाच संताप व्यक्त होत असून ही संवर्धन केंद्र हवेतच कशाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. निसर्ग मित्र संस्था चिपळूण आणि महाराष्ट्र शासन वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची अंडी कासव संवर्धन केंद्रात संवर्धित केली जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात असतानाच दाभोळ कासव संवर्धन केंद्रातील प्रकार समोर आल्याने निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जीव धोक्यात आला आहे. कासव संवर्धनासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु, खरोखरच यातून संवर्धन होतेय का हा प्रश्न सर्व ससमान्यांना पडला आहे. समुद्रातील एक अत्यंत महत्त्वाचा प्राणी म्हणजे कासव... वनविभागाने कोकणातील वनांबरोबर आता नवजात कासव पिल्लांची निर्दयपणे कत्तल सुरू केली आहे. शेड्यूल 1 या क्षेणीत कासव येते. बेकायदा जवळ बाळगणे, वा हत्या यासाठी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. या प्रकरणी सबंधितांवर कठोर व्हावी अशी मागणी होत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या