मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महिला दिनी कोल्हापुरातून आला धक्कादायक VIDEO; महिलेची एसटीखाली उडी घेऊन आत्महत्या

महिला दिनी कोल्हापुरातून आला धक्कादायक VIDEO; महिलेची एसटीखाली उडी घेऊन आत्महत्या

बराच वेळ ही महिला रस्त्याच्या कडेला बसून होती, अचानक तिने एसटीसोमर उडी मारली.

बराच वेळ ही महिला रस्त्याच्या कडेला बसून होती, अचानक तिने एसटीसोमर उडी मारली.

बराच वेळ ही महिला रस्त्याच्या कडेला बसून होती, अचानक तिने एसटीसोमर उडी मारली.

कोल्हापूर, 8 मार्च : जागतिक महिला दिनी (International Women's Day) कोल्हापूरातून एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आलं आहे. एका महिलेने चालत्या एसटी खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं हे धक्कादायक दृश्य आहे. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही.

आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरील मलबार हॉटेल समोर ही घटना घडली आहे. हॉटेलसमोरच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हे ही वाचा-कोल्हापूर पुन्हा ठरलं अव्वल! राज्यात डिजिटल ठरलेली पहिलीच जिल्हा परिषदेची शाळा

आज सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक एसटी कोल्हापूर एसटी स्टँडडकडे निघाली होती. यावेळी मलबार हाॅटेल समोर असलेल्या डीव्हायडवर एक 50 ते 55 वर्षांची महिला बराच वेळ बसली होती. मात्र अचानकच महिलेने एसटीच्या खाली उडी घेतली. एसटीच्या चाकाखाली सापडल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. संबंधित महिलेला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी सदर महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्यात या धक्कादायक घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. कोरोनाचा धोका असल्यामुळे छोटेखानी कार्यक्रमांसोबत सोशल मीडियावरही महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच कोल्हापूरात एका महिलेच्या आत्महत्येनंतर दु:ख व्यक्त केलं जात आहे. महिलेने आत्महत्या का केली, तिचं कुटुंबा आदी तपास पोलिसांकडून केला जात आहे.

First published:

Tags: India, Kolhapur, Maharashtra, St bus accident, Suicide, Womens day