रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदरातील आलमगीर हाफिज साहेब यांच्या मालकीची बैतुल रिझवान ही नौका मासेमारीसाठी गेली होती. परंतु खराब हवामानामुळे ती मिरकरवाडा बंदरात परत येत असताना इंजिन बंद पडले म्हणून दुसरी नौका त्याला ओढून बंदरात आणण्यास गेली. रस्सी बांधून येत असताना रस्सी तुटली आणि वाऱ्यामुळे आणि उंच लाटांमुळे बोटीचा ताबा सुटला. लाटांच्या तडाख्यामुळे बोट सकाळी 11 वाजता तुटली मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. VIDEO: रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, दापोलीत ढगफुटीसदृश्य पाऊस समुद्रात बोट भरकटलीरत्नागिरीत समुद्राला उधाण; अजस्त्र लाटांनी बोटीचे झाले तुकडे-तुकडे pic.twitter.com/0xwyNhmXAv
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2021
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रात आज सकाळी गोवर्धन पावसे यांची गया गंगेश्वरी बोट जलसमधी घेता घेता स्थानिक मच्छिमार बांधवांनी केलेल्या प्रयत्नामुळे थोडक्यात बचावली. परंतु समुद्रात ही बोट भरकटली असून या पाच सिलेंडरच्या बोटीचे मोठे नुकसान सुद्धा झाले. या बोटीवरील खलाशांनी मात्र समुद्रामध्ये उड्या टाकून आपले प्राण वाचवले आहे. या बोटीला वाचवण्यासाठी स्थानिक मच्छिमारांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि बोट गाळात रुतली. त्यामुळेच जलसमाधी मिळता मिळता बचावली. काल आजर्ले समुद्रात दोन बोटींना जलसमाधी मिळाली होती त्यापाठोपाठ पुन्हा आज सकाळी समुद्री उधाणाचा तडाखा बसून हर्णे समुद्रकिनारी एक बोट भरकटलेली मच्छीमार बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्णेला पावसाने झोड़पले रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे गावातील लोकांनी मुसळधार पावसामुळे रात्र जागून काढली. मुसळधार पावसाने पावसाने चांगलेच झोडपून काढले आणि बाजारपेठेमध्ये सर्वत्र तीन ते चार फुट पाणी घुसले. त्यामुळे रात्री अचानक तीन वाजता लोकांना घरे खाली करण्यास सांगण्यात आले. अनेक लोकांचे रात्रीच स्थलांतरही करण्यात आले. अचानक हरणे गावाला पुराचा वेळ का पळून रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. रस्त्यावर तीन ते चार फुट पाणी असल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती, या भीतीपोटी लोकांनी रात्र जागून काढली असून पहिल्यांदाच हरणे गावातील अनेक वाड्यामध्ये अशा प्रकारची पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांमध्ये चिंता पसरली आहे. संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे गड नदीला पूर आला आहे. गड नदीच्या पुराचे पाणी मखाजन बाजारपेठे शिरले त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. ऐन गणेशोत्सवापूर्वी बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे बाजारातले व्यवहार ठप्प झाले आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाणी आणखी आत शिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कासे, माखजन,कळंबुशी परिसरातली संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे.रत्नागिरीत बोट भरकटली pic.twitter.com/iJ5IZhhMuQ
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.