दौंड, 5 फेब्रुवारी/ सुमित सोनवणे : DYSP कार्यालयात कनिष्ठ लिपिकाने 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरेश रमाकांत कदम यांच्याविरोधात कारवाई केली आहे.
या प्रकरणात तक्रारदार यांनी शिरुरमधील त्यांच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौंड येथे अर्ज केला होता. त्यानंतर पोलीस संरक्षण देण्यासाठी तक्रारदार यांना 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळताच त्यांनी पडताळणी करून 15 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकाची पडताळणी करुन त्याच्यावर कारवाई केली.
हे ही वाचा-कुणा नेत्याची नाही, तर ही आहे आसडी गावातील जवानाची मिरवणूक, पाहा VIDEO
त्यामुळे पुन्हा एकदा दौंडमधील पोलीस लाच घेताना समोर आले आहेत. नागरिक आपले प्रश्न घेऊन पोलिसांकडे येतात. मात्र पैशांसाठी हेच पोलीस काम थांबवून ठेवतात. त्यामुळे जागरूक नागरिकाने त्यांच्यासोबत असा प्रकार घडल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर याची तक्रार करुन सर्व प्रकार समोर आणणे गरजेचे आहे. या प्रकरणातही 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरेश रमाकांत कदम यांच्याविरोधात कारवाई केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.