बीड, 05 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून करुणा शर्मा (Karuna Sharma in Parali) आणि राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि बीडचे (beed) पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यातला वाद आज बीडमध्ये शिगेला पोहोचला. करुणा शर्मा या परळीमध्ये दाखल झाल्या पण त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे अटक करण्यात आली. पण, त्याआधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक महिला गाडीची डिकी उघडून काही तरी ठेवत असल्याचे दिसून आले.
करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलेल्या रिव्हाल्वर नंतर आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. करुणा शर्मा गाडीतून वैद्यनाथ मंदिरासमोरून परत जात होत्या. त्यावेळी गाडीजवळ एक महिला आली. अनोळख्या तरुणीनं तोंडाला पूर्णपणे झाकलेलं असतं. ती तरुणी गाडीची डिकी उघडून त्यात काहीतरी वस्तू ठेवत असल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे. एवढंच नाहीतर तोंड बांधून असलेल्या या तरुणीसोबत आणखी तीन तरुणी तिथे आढळून आल्या आहे.
विशेष म्हणजे, यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते, सर्वजण करुणा शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देत आहे. तिथे एक पोलीस अधिकारी सुद्धा उभा होता. एवढ्या गर्दीत या तरुणीने गाडीत काय ठेवलं? आणि ठेवणारी तरुणी कोण? असे प्रश्न आता निर्माण झाले आहे.
Shocking! तरुणीच्या मृतदेहासोबत लावलं लग्न; समोर आलं धक्कादायक कारण
दरम्यान, परळी येथील वैजनाथ मंदिराच्या समोर दर्शनासाठी आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या नंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एक पिस्तुल आढळून आली, यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप करून शर्मा यांनी केला आहे.
धनंजय मुंडे- करुणा शर्मा यांच्यामधील वाद
करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तसंच ट्विट करत तक्रारीची कॉपीपोस्ट केली होती. यावेळी रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप केले होते, यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध व प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली तसंच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत. या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन आपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते.
काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण तीन चार महिने शांत झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या सोबत घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा शर्मा या संपत्ती पासून सामाजिक आणि राजकीय विषयावर ती कायम भाष्य करत होत्या. तसंच फेसबुक लाईव्ह करत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मी परळीमध्ये येणार आहे तसंच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असं सांगितल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.