भक्ताच्या बायकोला घेऊन पळालेल्या महाराजाबाबत आणखी एक धक्कादायक सत्य समोर!

भक्ताच्या बायकोला घेऊन पळालेल्या महाराजाबाबत आणखी एक धक्कादायक सत्य समोर!

प्रवचनासाठी गेल्यानंतर चक्क भक्ताची बायकोच पळवून नेत्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

  • Share this:

भंडारा 8 फेब्रुवारी : बाबा आणि महाराज यांचा वेष घेतलेल्या काही जणांची विकृती गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने समोर येत आहे. अशातच एका महाराजाने प्रवचनासाठी गेल्यानंतर चक्क भक्ताची बायकोच पळवून नेत्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याच भोंदूबाबाबद्दल आता आणखी नवी माहिती समोर आली आहे.

भंडारा जिल्ह्यामध्ये भागवत सप्ताह करण्यासाठी एका गावात आलेल्या एका तथाकथित महाराजाने गावातल्याच एका विवाहित तरुणीला फुस लावून पळवून नेल्याचं उघड झालं. हा महाराज महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याचं उघड झालं. महाराजाच्या कृष्णकृत्याचा भांडाफोड झाला असून त्याच्याबाबत आता नवा खुलासा झाला आहे. या महाराजाला तब्बल 4 बायका असल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक गावांमध्ये दरवर्षी भागवत सप्ताहाचं आयोजन केलं जातं. गावकरी आणि गावातल्या सामाजिक संघटना एकत्र येवून हा कार्यक्रम करत असतात. अशाच एका भागवत सप्ताहाचं आयोजन भंडारा जिल्ह्यातल्या मोहदुरा इथं घडली. या गावात दिनेशचंद्र मोहतुरे महाराज याला भागवतासाठी बोलावण्यात आलं होतं. बोलण्यात चतुर असलेला हा महाराज भागवत कथा सांगण्याचं काम करतो. सावनेर जवळच्या कुबाडा या गावचा तो राहणारा आहे.

पाच वर्षांपासून मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

वर्षभरापूर्वीही त्याने याच गावात भागवत सप्ताह केला होता. सात दिवस चालेल्या सप्ताहाची नुकतीच समाप्ती झाली. त्यानंतर तो गावातून गेला. गावकऱ्यांनी त्याला चांगलं मानधनही दिलं होतं. मात्र तो गेल्यानंतर एका घरातली तरुण विवाहिता बेपत्ता असल्याचं लक्षात आलं.

घरच्यांनी प्रेमाला नाकारलं, मुलीने मुलाचं घरं गाठलं पण...

ही महिला एका 5 वर्षांच्या मुलाची आईही आहे. तिच्या सासऱ्याची आणि त्याची ओळख होती. तिच्या घरीही तो काही दिवस राहिला होता. त्याच दरम्यान त्याने तिच्याशी सुत जमवलं आणि भागवत सप्ताह संपल्यानंतर तो तिला घेऊन पळून गेला. घरातल्या लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यानंतर मोबाईलवर महाराजाशी संपर्क साधला असता ते दोघे वृंदावनमध्ये असल्याचं त्याने सांगितलं.

आता या महाराजाच्या अनेक कथा समोर येत असून तो विवाहित आहे आणि त्याला एक मुलगीही आहे असल्याचं समोर आलं आहे. तसंच आतापर्यंत त्याने आधी 4 महिलांसोहत असाच प्रकार केल्याचंही उघड झालं आहे.

First published: February 8, 2020, 9:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading