धक्कादायक! पाच दिवस मृतदेह घरात होता कुजत; नातवाला मात्र आजीच्या सोन्याची चिंता

धक्कादायक! पाच दिवस मृतदेह घरात होता कुजत; नातवाला मात्र आजीच्या सोन्याची चिंता

महाराष्ट्रातील अत्यंत लाजिरवाणी घटना, गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणारा प्रकार

  • Share this:

सांगली, 27 सप्टेंबर : गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पाच दिवस अंत्यसंस्काराविना पडून राहिलेल्या एका वृद्ध महिलेवर अखेर इन्साफ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले. मात्र, ती आजी गेल्याचे दुःख ही त्याच्या रक्तातील नातलगांना नसून त्यांनी तर आजीच्या मृत्यूनंतर तिच्याजवळ असणाऱ्या सोन्याची चौकशी केली. मन पिळवटून टाकणारा हा धक्कादायक प्रकार सांगली शहरानजीक एका गावात घडला आहे.

सांगली शहराजवळील एका गावात सत्तरीतील आजी एकटीच राहत होती.

तिला चार मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मात्र, काही कारणास्तव त्या आजीवर वृद्धावस्थेतही एकटीने राहण्याची वेळ आली. स्वतःच कशीबशी दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करीत हलाखीचे आयुष्य जगत होती. पैशांच्या कमतरतेमुळे व्याधींकडे लक्षच दिले नाही. अखेर पाच दिवसापूर्वी त्या आजीचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनाही माहिती नव्हती. इतकी दुर्दैवी बाब त्या आजीच्या नशीबी आली. पाच दिवसानंतर आजी न दिसल्याने आल्याने शेजारीपाजारी राहणाऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यानंतर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनाही याबाबत माहिती मिळाली. हा सारा प्रकार ऐकून त्यांनाही धक्का बसला.

हे ही वाचा-पुणे तिथे, नियम उणे; तळजाई टेकडीवर भरली जत्रा, पाहा हे PHOTOS

त्यांनी तातडीने इन्साफचे प्रमुख मुस्तफा मुजवार यांना कळविले. मुस्तफा टीम घेवून तातडीने रवाना झाला. कुजलेल्या अवस्थेत असलेला तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेवून जाताना कुटुंबातील एकास आजीची आठवण आली. नातू धावात आला काही विचारण्यापूर्वीच त्याने आजी जवळील सोन्याची विचारणा केली. साऱ्यांनाच धक्का बसला. अखेर त्याला तेथून हुस्कावून लावण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ आणि इन्साफचे ऋत्विक डुबल, सचिन कदम, दादासो मोहिते हे आजीला  अंत्यसंस्कारासाठी घेवून गेले. शास्त्रशुद्धपणे त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आजच्या युगात नात्यांना काळीमा फासणारी ही घटना शहरानजीक घडल्याने वाऱ्यासारखी पसरली. समाजमाध्यमांसह विविधस्तरावरून रोष व्यक्त केला जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 27, 2020, 11:01 AM IST

ताज्या बातम्या